Tuesday 13 July 2021

मदनमोहन-रा.मेहदी अली-राजेंद्रकृष्ण




मदन मोहन- राजा मेहंदी अली खान

मदनमोहनने चित्रपट कारकीर्द सुरू केली तीच मूळात आंखे या चित्रपटापासून आणि त्यासाठी गीतकार होते राजा मेहंदी अली खां. पुढे मदनमोहन आणि लता ही जोडी खुप जमली पण गंमत म्हणजे मदनमोहनच्या पहिल्या चित्रपटात लताचा आवाज नाही.  मुकेश, रफी, शमशाद, मीना कपूर यांचे आवाज या चित्रपटात त्याने वापरले आहेत. मदनमोहनने जवळपास 100 चित्रपटांना संगीत दिले. राजा मेहंदी अली खान सोबत जवळपास 12 चित्रपट मदन मोहनने केले. आंखे (50), मदहोश(51), जागीर (59), अनपढ (62), आप की परछाईया (64) वो कौन थी (64) नीला आकाश (65), दुल्हन एक रात की (66), मेरा साया (66) जब याद किसी की आती है (67) नवाब सिराजउद्दौला (67). संख्येने राजेंद्रकृष्ण सोबत जास्त चित्रपट मदनमोहनने केले असले तरी त्याची गाणी जास्त गाजली ती राजा मेहंदी अली खान सोबतचीच. या जोडीच्या जेमतेम 12 चित्रपटात 25 गोड गाणी सहज सापडली. जेंव्हा की मदनमोहन राजेंद्रकृष्ण या जोडीच्या 36 चित्रपटात मिळून 25 गाणी सापडली होती.  

    गाणे         गायक       चित्रपट

1. मोरी अटरीया पे कागा बोले-मीना कपूर-आंखे
2. माने ना बदलम परदेसिया-लता- जागीर
3. तूमसे नजर मिी-गीता-जागीर
4. मेरी याद मे तूम-तलत-मदहेाश
5. छोड मुझे ना जाना-लता-मदहोश
6. मेरे दिला की नगरीया-लता-मदहोश
7. आपकी नजरोंने समझा-लता-अनपढ
8. है इसी मे प्यार की आबरू-लता-अनपढ
9. जिया ले गयो जी मोरा सावरीया-लता-अनपढ
10. सिकंदर और पौरस न की थी लडाई-महेंद्र-अनपढ
11. वो देखो जला घर किसी का-लता-अनपढ
12. अगर मुझसे मुहोब्बत है-लता-आपकी परछाई
13. ये ही है तमन्ना तेरे घर के सामने-रफी- आपकी परछाई
14. लग जा गले- लता-वो कौन थी
15. नैना बरसे रिम झिम-लता-वो कौन थी
16. जो हमने दास्ता आपनी सुनाई--लता-वो कौन थी
17. शौक नजर की बिजलीया-आशा-वो कौन थी
18. आपको प्यार छुपाने की बुरी आदत है- आशा/रफी-नीला आकाश
19. झुमका गिरा रे-आशा-मेरा साया
20. नैनो मे बदरा छाये-लता-मेरा साया
21. तू जहां जहां चलेगा-लता-मेरा साया
22. आपके पहलू मे आके रो दिये-रफी-मेरा साया
23. नैनोवाली ने हाय मेरा दिल लूटा-आशा-मेरा साया
24. प्रीत लगाके मैने ये फल पाया-मुकेश-आंखे
25. मैने रंग ली आज चुनरीया-लता-दुल्हन एक रात की

मदन मोहन- राजेंद्रकृष्ण जोडी

मदन मोहन ने सगळ्यात जास्त चित्रपट केले ते राजेंद्रकृष्ण यांच्यासोबतच. या चित्रपटांची संख्या 36 इतकी निघते आहे. या चित्रपटांमधील गाणीही मोठी गोड आहेत. यातील निवडक पंचविस गाणी रसिकांच्या माहितीसाठी देतो आहे.

    गाणे         गायक       चित्रपट

1. ए दिल मुझे बता दे- गीता- भाई भाई
2. कौन आया मेरे मन के द्वारे- मन्ना डे- देख कबीरा रोया
3. हम से आया न गया- तलत- देख कबीरा रोया
4. तू प्यार करे या ठुकराये- लता- देख कबीरा रोया
5. हम पंछी मतवाले- लता/गीता- देख कबीरा रोया
6. बैरन निंद न आये-लता-चाचा जिंदाबाद
7. तूम चल रहे हो हम चल रहे हो- लता/मुकेश- दुनिया ना माने
8. मै तो तूम संग नैन लडाके हार गयी सजना-लता- मनमौजी
9. जरूरत है जरूरत है-किशोर- मनमौजी
10. फिर वोही शाम वोही गम-तलत-जहां आरा
11. ए सनम आज ये कसम खाये-तलत/लता- जहां आरा
12. यु हसरतों के दाग-लता-अदालत
13. उनको ये शिकायत है के हम-लता- अदालत
14. जमी से हमे आसमां पे बिठा के भूला तो न दोगे-रफी/आशा-अदालत
15. ना तूम बेवफा हो- लता-एक कली मुस्कूरायी
16. ये नयी नयी प्रीत है-लता/तलत- पॉकेटमार
17. हम प्यार मे जलने वालों को-लता/तलत-जेलर
18. मेरी हिरनी जैसी चाल- आशा/रफी-जेलर
19. वो भूली दास्तां- लता- संजोग
20. भूली हुई यादे मुझे इतना ना सतावो-मुकेश-संजोग
21. एक मंझिल राही दो फिर प्यार क्यू ना हो-लता/मुकेश-संजोग
22. कभी तेरा दामन ना छोडेंगे हम-आशा/रफी- नींद हमारी ख्वाब तूम्हारे
23. केतहा है दिल हो तूम मेरे लिये-तलत/आशा- मेम साहेब
24. दो घडी वो जो पास आ बैठे-आशा/रफी- गेटवे ऑफ इंडिया
25. कभी ना कभी कही ना कही- रफी- शराबी
   
आफताब परभनवी.  

Thursday 22 April 2021

दिवंगत शशीकलाची अवीट गाणी



23 एप्रिल 2021 

जसं की खुश है जमाना आज पेहली तारीख हे एक सार्वकालीक हिट गाणं आहे तसंच एक दुसरं एक गाणं आहे वाढदिवसाचं ‘तूम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार’. हे सार्वकालिक हिट गाणं जिच्यावर चित्रीत झालं ती नायिका किती जणांना आठवते? वक्त चित्रपटांत आशा भोसलेचे गाजलेले गाणे ‘आगे भी जाने न तू’ पडद्यावर सुनील दत्त आणि साधना यांच्यावर चित्रित झालं आहे. शशी कपुर सामान्य असा पार्टीच्या बाहेर उभा आहे. पण तिसरा भाउ राजकुमार जिच्या बरोबर त्याच पार्टीत बॉल डान्स करतो ती नायिका कोण? जी पुढे खलनायिका किंवा व्हॅम्प म्हणूनच लक्षात राहिली ती देखणी मुळची मराठी असलेली नायिका शशीकला जवळकर म्हणजेच शशीकला. 

सुरवातीला नुरजहांच्या लहानपणीची भूमिका करण्यासाठी तिला घेण्यात आलं. ‘झिनत’ (1945) चित्रपटांतील केवळ स्त्रीयांनी गायलेली पहिली कव्वाली म्हणजे ‘आहे ना भरी शिकवे ना किये, कुछ भी न जुबां से नाम लिया, फिर भी न मोहब्बत छुप न सकी, जब तेरा किसीने नाम लिया’. यात पहिल्यांदा देखण्या 13 वर्षांच्या शशीकलाचा चेहरा ठळकपणे रसिकांच्या समोर आला. 

पुढे नियतीने घेतलेली चित्रविचित्र वळणे, शशीकलाच्या आयुष्यातील वादळे, तिचे स्वत:चे चुक बरोबर निर्णय या सर्वांत तिची चित्रपट कारकीर्द घडत गेली. तिच्या चित्रपटांची यादी करायला गेली तर उणीपुरी 100 ची निघते. तिच्या ‘खलनायिके’च्या रूपाचाच पुढे बोलबाला झाला पण तिच्यातील एक कसलेली नृत्यांगना आणि तिच्या वाट्याला आलेली काही गोड गाणी मात्र दुर्लक्षली गेली. आजही काही गाजलेली गाणी शशीकलावरची आहेत हे लक्षात येत नाही. 

89 वर्षांचे दीर्घ आयुष्य तिच्या वाट्याला आले. 4 एप्रिल 2021 ला तीचा मृत्यू झाला. वेडी वाकडी वळणे घेणारे तिचे आयुष्य अखेरच्या टप्प्यावर मुलगी जावाई आणि नातवंंडात सुखात गेलं.

तिच्या सुंदर अवीट गोडीच्या गाण्यात प्रामुख्याने येतं ते शर्त (1954) मधील हेमंत कुमारच्या संगीतातील गीताचे गोड गाणे ‘चांद घटने लगा, रात ढलने लगी, आरजू मेरे दिल की मचलने लगी’. गाण्याचे बोल तर राजेंद्रकृष्ण यांनी सुंदर लिहिले आहेतच पण गीताचा आवाज आणि शशीकलाचा अभिनय यांनी त्याला न्याय दिला आहे. 1954 ला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. यातलंच ‘न ये चांद होगा’ हे गाणे बीनाकात तेंव्हा अतिशय गाजले होते. हेमंत कुमारच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे लता, गीता आणि आशा तिघींचेही आवाज यात वापरले आहेत.

हेलनची एक नृत्यांगना म्हणून प्रतिमा आहे. तिच्यासमोर/ सोबत नाचणं म्हणजे मोठे आवाहन. पण शशीकलाने देवआनंदच्या नौ दो ग्यारह (1957) मध्ये हे सार्थपणे पेलून दाखवलं आहे. ‘क्या हो फिर जो दिन रंगीला हो’ हे गीता/आशाचे सार्वकालीक हिट गाणे. मजरूहने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. यात आशाचा आवाज हेलन साठी तर गीताचा आवाज शशीकला साठी वापरला आहे. शशीकलाच्या अगदी दोन तीनच गाण्यांची निवड करायची झाली तर हे गाणं मी निवडेन.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढा नाही चालला पण यातील ‘आंखो मे क्या जी’, ‘कली के रूप मे’ सारखी गाणी मात्र बिनाकात गाजली. गीता आशाचे हे गाणे तर आजही अवीट असेच आहे.  

शशीकलाच्या वाट्याला आलेलं सर्वात सुंदर गीत ‘सुजाता’ (1959) मधील ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ हे आहे. लताचा आवाज एव्हाना सचिन देवबर्मन यांच्या संगीतातून गायब झाला होता. स्वाभाविकच गीता आणि आशाचा आवाज या काळात त्यांच्या संगीतात प्रामुख्याने झळाळून उठलेला दिसून येतो. मजरूहच्या या शब्दांना पडद्यावर अतिशय जिवंतपणे शशीकलाने साकारले आहे. आशाचे केवळ आलाप नुतनच्या तोंडी आहेत. संपूर्ण गाणे गीता आणि शशीकला यांनी उचलून धरले आहे.

याच सुजाता मध्ये वर ज्याचा उल्लेख केला आहे ते ‘तूम जियो हजारो साल’ हे गाणे आहे. पियानोवर बसलेली सजलेली देखणी शशीकला आणि अंधारात स्वत:ला हरवून टाकणारी नुतन असा विरोधाभास रंगवलेला आहे. गाण्याला आवाज आशाचा आहे. गाणं शशीकलाच्या तोंडी नाही पण तीच्यावर चित्रित आहे.

शशीकलाच्या वाट्याला हिट चित्रपट आले पण तिची भूमिका आता बदलत चालली होती. सहनायिका म्हणून शम्मी कपुरच्या गाजलेल्या जंगली (1961) मध्ये तिच्याही वाट्याला एक छानसे गाणे आले आहे. यातील इतर गाजलेल्या गाण्यांमुळे हे गाणे दुर्लक्षीत राहिलं. किशोर कुमारचा भाउ अनुप कुमार आणि शशीकलावरचे ‘नैन तुम्हारे मजेदार ओ जनाबे अली’ हे गाणे आशा/मुकेश यांच्या आवाजात आहे. गाजलेल्या बॉक्स ऑफिसवरच्या रंगीत  चित्रपटांतील हे तिचे पहिले गाणे.

पुढे तिच्या वाट्याला ऍटम सांग यायला लागली. पण 1964 ला ‘अपने हुये पराये’ मध्ये मनोज कुमार सोबत तिला एक छानसे गाणे मिळाले. संगीत शंकर जयकिशनचे होते. शैलेंद्रच्या शब्दांना लता आणि हेमंत कुमारच्या आवाजाची कॉपी वाटणारा सुबीर सेन यांनी गायले होते. ते गाणे होते ‘गगन के चंदा न पुछ मुझसे’. 

वक्त (1965) तेंव्हाचा पहिला मल्टी स्टारर चित्रपट. यातलं सुरवातीला उल्लेख केलेलं आशाच्या आवाजातलं गाणं ‘आगे भी जाने न तू’ यात राजकुमार सोबत नृत्य करायला शशीकलाच आहे. पण साधना-सुनील दत्त नायक नायिका असल्याने सगळं लक्ष त्यांच्यावरच खिळून राहतं.

फुल और पत्थर (1966) मधील ‘शीशे से पी या पैमाने से पी’ सारखी गाणी तिने केली. जी आयटम सांग होती. पण याच वर्षी एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आला अनुपमा (1966). हेमंत कुमारच्या संगीतात दोन अतिशय सुंदर सोलो गाणी शशीकलाच्या वाट्याला आली. कैफी आजमीचे शब्द आणि आशाचा आवाज या गाण्यांना लाभला.पहिलं गाणं होतं ‘क्यु मुझे इतनी खुशी मिली’. आणि दुसरं त्याचं जूळं भावंडं शोभावं असं गाणं होतं, ‘भिगी भिगी हवा’. आजही ही दोन गाणी ऐकताना शशीकला सारखी गुणी अभिनेत्री बाजूला पडली  याची खंत जाणवते.
 
तिच्या सगळ्यां गाण्यांतून एक छोटी यादी करायची तर हाताशी लागतात ही गाणी.

1. आहे ना भरी शिकवे ना किये, झिनत (1945)
2. चांद घटने लगा रात ढलने लगी, शर्त (1954)
3. क्या हो फिर जो दिन रंगीला हो, नौ दो ग्यारह (1957)
4. बचपन के दिन भी क्या दिन थे, सुजाता (1959)
5. तूम जियो हजारो साल, सुजाता (1959)
6. नैन तुम्हारे मजेदार, जंगली (1961)      
7. गगन के चंदा, अपने हुये पराये (1964)
8. आगे भी जाने न तू, वक्त (1965)
9. शीशे से पी या पैमाने पी, फुल और पत्थर (1966)
10. क्यु मुझे इतनी खुशी मिली, अनुपमा (1966)
11. भिगी भिगी हवा, अनुपमा (1966)

शशीकलाच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.

(सर्व गाणी  u tube वर उपलब्ध आहेत) 

-आफताब परभनवी.  
 




Friday 25 October 2019

१० नंबरी नायकांची १०० नंबरी गाणी


मोहनगरी दिवाळी 2019

दिलीप-देव-राज हे हुकूमाचे तीन एक्के हिंदी सिनेमावर राज्य करत होते तो म्हणजे 1950 ते 1970 चा कालखंड. या काळात 1952 ला एक चित्रपट आला ज्यात यांपैकी कुणीही नव्हते. हा चित्रपट राज कपुर-देव आनंद यांच्यासारख्या बड्या निर्मात्यानेही तयार केला नव्हता. ‘प्रकाश पिक्चर्स’ या बर्‍यापैकी पण आता बुडित निघालेल्या संस्थेने हा चित्रपट काढला होता. इसाक मुजावर यांनी आपल्या पुस्तकात याबाबत एक किस्सा नोंदवला आहे (‘चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ 1931-1960’, प्रकाशक- प्रतीक प्रकाशन, पुणे.). निर्माते शंकरभाई व विजय भट्ट एक कुलूप घेवून संगीतकार नौशाद यांच्याकडे गेले. ते नौशाद यांना असे म्हणाले, ‘आमची प्रकाश पिक्चर्स चालावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा भाव आमच्यावर न लादता कमी पैशात आमच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाची संगीताची जबाबदारी स्वीकारा अन्यथा हे कुलूप तुमच्या हातानेच प्रकाश पिक्चर्सला लावून संस्था कायमची बंद करून टाका.’

पुढे काय आणि कसा इतिहास घडला हे रसिकांना चांगलेच माहित आहे. ‘बैजू बावरा’ ने मीनाकुमारी सारख्या नायिकेची कारकीर्द घडवली, नौशाद तर आधीच टॉपला होते पण या संगीताने त्यांच्या कारकीर्दीला चारचांद लावले. हा इतका ‘हिट’ चित्रपट देवूनही तसेच पुढेही भरपूर सांगितीक हिट चित्रपट देवूनही भारत भुषण यांच्या वाट्याला समीक्षकांचे कौतुक मात्र आले नाही. त्यांची गणना ‘अ’ दर्जाच्या अभिनेत्यांमध्ये कधी कुणी केली नाही. 

दिलीप-देव-राज यांच्या झंझावातात भारतभुषणच्या चित्रपटाची गाणी नुसती टिकलीच नाही तर अजूनही ती रसिकांच्या ओठांवर आहेत, बिनाकात तेंव्हा ही गाणी तुफान गाजली, आजही जून्या गाण्यांमध्ये ही गाणी जास्त ऐकली जातात. 

ज्या दहा नायकांनी दिलीप-देव-राज यांनी गाजवलेल्या काळातही आपल्या गाण्यांनी रसिकांच्या मनात घर केले त्यातील पहिले नाव म्हणजे भारत भुषण. या शिवाय मग प्रदीप कुमार, किशोर कुमार (नायक म्हणून), गुरूदत्त, जॉनी वॉकर, राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त, धर्मेंद्र  आणि मनोजकुमार ही नावं घ्यावी लागतात.

पहिला टप्पा 1951-1956 (भारतभुषण, प्रदीपकुमार, किशोरकुमार, गुरूदत्त, जॉनी वॉकर) 

1950 नंतर चित्रपट संगीतकारांना स्टार व्हॅल्यु प्राप्त व्हायला सुरवात झाली होती.‘बैजू बावरा’चेच उदाहरण घ्यायचे  तर आपली किंमत कमी करूनही तेंव्हा नौशाद यांनी 50 हजार इतके मानधन घेतले होते. तर भरत भुषणला केवळ सहा हजार मिळाले होते. 

‘बैजू बावरा’च्या यशानं रतभुषणला सांगितिक चित्रपट पुढे सतत मिळत गेले. ‘बैजू बावरा’त  त्याच्यासाठी रफीनी गायलेली गाणी ‘मन तडपत हरी दर्शन को आज’, ‘ओ दुनिया के रखवाले’, ‘तू गंगा की मौज मै जमूना का धारा’ (लतासोबत), ‘झुले मे पवन की’ (लता सोबत) रसिकांनी प्रचंड डोक्यावर घेतली. सांगितीक हिट चित्रपटांची यादी कधीही केली तरी त्यात बैजू बावराचे नाव घेतले जाणारच. 

याच्या पुढच्याच वर्षी आलेला असाच सांगितीक हिट चित्रपट ज्यात दिलीप-देव-राज हे कुणीच नव्हते शिवाय यांच्याशी जोडला गेलेला संगीतकारही नव्हता. ‘बैजू बावरा’चे नौशादही दिलीप कुमारशी जोडल्या गेलेले होतेच. पण 1953 ला सी.रामचंद्र यांच्या ‘अनारकली’ ने सगळीकडे धूम केली. तेंव्हा त्याचा नायक प्रदीप कुमार अगदीच नवखा होता. त्याचा ‘आनंदमठ’ आधी येवून गेला होता. पण त्याला स्टार व्हॅल्यू प्राप्त झाली नव्हती. पुढेही भारतभुषण सारखीच त्यालाही तशा अर्थाने स्टार व्हॅल्यू कधीच प्राप्त झाली नाही. 

बिनाका गीतमाला नुकतीच सुरू झाली होती. आणि पहिल्याच वर्षी अनारकलीचे ‘ये जिंदगी उसी की है’ पहिल्या ‘पायदान’ वर आले. भारतभुषण सारखेच प्रदीपकुमारवरही सांगितीक चित्रपटाचा शिक्का बसला आणि त्याला पुढेही तसेच चित्रपट मिळत गेले. भारतभुषण सारखेच त्यालाही समीक्षकांनी कधी अव्वल अभिनेता मानले नाही. या दोघांवरही ‘ठोकळा’ म्हणूनच शिक्का बसला. ‘अनारकली’ गाजला पण त्यात प्रदीपकुमारच्या वाट्याला ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’ व ‘जाग दर्द इश्क जाग’(लता सोबत) ही हेमंतकुमारच्या आवाजातील दोनच गाणी होती. 

भारतभुषण आणि प्रदीपकुमार यांच्या शिवाय याच काळात अजून एक नायक समोर आला ज्याची गाणी रसिकांनी उचलून धरली. व्यावसायिक यश मिळालेला त्याचा पहिला चित्रपट होता ‘लडकी’. गायक म्हणून गाजलेल्या हा नायक म्हणजे किशोरकुमार. खरं तर ‘लडकी’चा नायक भारतभुषण होता. पण त्याला कुठले गाणे यात नव्हते. किशोर कुमारलाही अवघे एकच गाणे यात मिळाले होते, ‘शादी, किस्मत की बात है’. किशोरच्या या मस्तीखोर गाण्याने त्याची तीच प्रतिमा बनत गेली. पुढे त्याला भूमिकाही तशाच मिळत गेल्या आणि केवळ गाणी मिळाली तेंव्हाही बहुतांश ती तशीच मिळत गेली. 

या तिघांशिवाय ज्याच्या गाण्यांनी प्रभाव गाजवला असा चौथा नायक म्हणजे गुरूदत्त. गुरूदत्तचे सिनेमे अतिशय कमी आणि तशीच गाणीही फारशी नाहीत. पण या काळावर अभिनयासोबतच एक सांगितीक ठसा त्यानं उमटवला हे मान्यच करावं लागेल. संगीत दिग्दर्शनाचा विचार केला तरी एस.डी.बर्मन, ओ.पी.नय्यर, सी.रामचंद्र या अगदी स्टार संगीतकारांसोबतच मुकूल रॉय, रवी, हेमंतकुमार यांच्यासोबतही त्याने चित्रपट केले. आणि त्यातील गाणीही लोकप्रिय झाली.  गुरूदत्त स्वत: दिग्दर्शक, निर्माता पण त्याने सुरवातीला देवआनंदला संधी दिली. देवआनंदने ‘बाजी’ मधून त्या संधीचे सोने करून दाखवले. ‘बाजी’चे संगीतही गाजले. पुढचा गुरूदत्त प्रॉडक्शनचा चित्रपट होता ‘बाज’. यात गुरूदत्तने स्वत:च काम केले. पण हा चित्रपटही चालला नाही आणि संगीताचीही फारशी दखल घेतल्या गेली नाही. 

1954 ला आलेल्या ‘आरपार’ने गुरूदत्तला पडद्यावरचा नायक म्हणून सूर गवसला. ओ.पी.नय्यरलाही रसिकांची नाडी अचूक गवसली. पुढे एक दोन नाही तर तब्बल 15 वर्षे ओ.पी. संगीतकार म्हणून यशाच्या शिखरावर राहिले. या ‘आरपार’ मध्ये गुरूदत्तच्या वाट्याला दोन द्वंदगीते आली आहेत. ‘सुन सुन जालिमा’ आणि ‘मोहब्बत करलो जी भरलो’. रफी-गीताच्या या गाण्यांनी गुरूदत्तची एक रोम्यांटिक प्रतिमा तयार झाली. पुढे त्याची जी एक करूण अशी प्रतिमा तयार करण्यात आली, ट्रॅजेडी म्हणजे गुरूदत्त असे जे समजण्यात येवू लागले त्यापेक्षा ही प्रतिमा वेगळी तरूणांना आकर्षित करणारी आणि रसरशीत अशी होती.

याच ‘आरपार’ मध्ये गुरूदत्त सोबतच त्याच्या चित्रपटांत सतत असणार्‍या जॉनी वॉकरचे पण एक गाणं आहे. ‘अरे ना ना तौबा’. गुरूदत्तच्या चित्रपटांत आणि नंतर एकूणच त्या काळात जॉनी वॉकरचे किमान एखादे तरी गाणे चित्रपटांत असायचेच. ही सगळीच गाणी रफीसारख्या तेंव्हाच्या मातब्बर गायकाने गायली आहेत. एखाद्या नायका इतकीच लोकप्रियता जॉनी वॉकरच्या गाण्यांना लाभली आहे. याच वर्षी देवआनंदच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’मध्ये एक गाणं केवळ जॉनी वॉकरचं नाही पण या गाण्यात तो होता आणि त्यानं आवाजही दिला होता. किशोरकुमारचं हे देवआनंदवरचे गाणे होते ‘चाहे कोई खुश हो चाहे गालिया हजार दे. ’ या गाण्यात मधून मधून जॉनी वॉकर स्वत: गायला आहे. पण ‘आरपार’ मधील ‘अरे ना ना तौबा तौबा’ हे त्याला मिळालेलं स्वतंत्र पहिलं गाणं आहे. दिलीप-देव-राज यांच्या काळात गाण्याचा विचार करताना त्यांच्या शिवायचा पाचवा नायक म्हणून जॉनी वॉकरला लक्षात घ्यावे लागेल. 

1951 ते 1956 असा हा पहिला पाच वर्षाचा कालखंड. यात भारतभुषण, प्रदीपकुमार, किशोरकुमार, गुरूदत्त आणि जॉनी वॉकर यांची गाणी चित्रपटांमधून गाजत राहिली.

‘बैजू बावरा’ नंतरचा भरतभुषणचा दूसरा महत्वाचा चित्रपट म्हणजे महाकवी गालिबच्या जिवनावरचा ‘मिर्झा गालिब’. हा चित्रपट तसा उताराला लागलेली सुरैय्या, गुणी असून व्यवसायीक यश न लाभलेला संगीतकार गुलाम मोहम्मद आणि यश मिळूनही स्टारपद न मिळालेला भारतभुषण यांचा अतिशय गाजलेला चित्रपट. ‘दिले नादान तूझे हुआ क्या है’ ही गालिबची अजरामर गझल तलत व सुरैय्याच्या आवाजात आहे. रफी सोबतच तलतचाही आवाज भारतभुषण साठी इथे वापरला आहे. याच चित्रपटातील बिनाकात गाजलेली रफीच्या आवाजातील गझल ‘है बस की हर इक’  मात्र भारतभुषणच्या तोंडी नाही. रस्त्यावर एक भिकारी ही गात चालला असे दृश्य आहे. ‘या रब वो न समझे है न समझेगे मेरी बात, दे और दिल उनको जो ना दे मुझको जुबां और’ हा गाजलेला शेर यातलाच आहे. 

1956 ला भारतभुषणचा पुढचा चित्रपट आला तो म्हणजे ‘बसंत बहार’. बिनाकात हिट ठरलेले ‘बडी देर भयी’ हे रफीच्या आवाजातील आणि मन्ना-लताच्या युगल स्वरांतले ‘नैन मिले चैन कहां’ ही दोन्ही गाणी यातलीच. शंकर जयकिशनने आपल्यावरचा पाश्चात्य सुरावटीचा ठसा मिटवून अस्सल भारतीय शास्त्रीय संगीतावरच्या रचना देवून टिकाकारांना या चित्रपटात गप्प केले होते.

‘अनारकली’ नंतर पुढचा संगीतमय चित्रपट प्रदीपकुमारच्या वाट्याला आला तो म्हणजे ‘नागीन’(1954). हेमंतकुमार एक संगीतकार म्हणून ठळकपणे समोर आले आणि ज्याची व्यावसायिक पातळीवर अव्वल म्हणून दखल घेतल्या गेली तो हाच चित्रपट. यातील गाणी तुफान गाजली. पण अर्थातच बिनाकाचे सगळे यश लताच्या तीन गाण्यांना मिळाले (मन डोले मेरा तन डोले, मेरा दिल ये पुकारे आजा, जादूगर सैय्या). ते भाग्य प्रदीपकुमारच्या गाण्यांना लाभले नाही. पण प्रदीपकुमारच्या वाट्याला आलेली हेमंतकुमारच्या आवाजातील ‘ओ जिंदगी के देनेवाले’,  ‘तेरे द्वार खडा एक जोगी’, ‘अरी छोड रे पतंग’ (लता सोबत), ‘हसिनों मुझसे मत पुछो’ (आशा सोबत) ही गाणी अवीट गोडीची आहेत. 

‘नागीन’ पाठोपाठ 1956 मध्ये प्रदीपकुमारचा मधुबाला सोबतचा ‘राजहठ’ पडद्यावर आला. यातही त्याच्या वाट्याला मुकेशच्या आवाजातील ‘ये वादा करो चांद के सामने’ (लता सोबत) आणि रफीचे नितांत सुंदर ‘आऐ बहार बनके लुभाके चले गये’ ही दोन गाणी आली होती. 

किशोरकुमारचा ‘अधिकार’ 1954 ला चांगले व्यवसायीक यश मिळवून गेला. गीतासोबतचे त्याचे ‘कमाता हुं बहोत कुछ भी’ आजही लोकप्रिय आहे. ‘तिकडम बाजी’ सारखे त्याचे सोलो, मस्तीखोर गाण्यांची परंपरा सांगणारे आहे. अविनाश व्यास सारख्या दूर्लक्षीत संगीतकाराला मात्र या चित्रपटाच्या यशाचा फारसा फायदा झाला नाही. 

शंकर जयकिशनच्या संगीतात किशोर कुमार फारसा नाही. पण 1956 ला आलेल्या ‘न्यु दिल्ली’ त मात्र ही जोडी जमली आहे. ‘नखरेवाली देखने मे’ किंवा ‘अरे भाई निकलके आ घर से’ सारखी गाणी देत आपणही किशोरच्या मस्तीला सांगितीक न्याय देवू शकतो हे शंकर जयकिशनने सिद्ध केले आहे. 

गुरूदत्तचा अतिशय अप्रतिम ‘मि. ऍण्ड मिसेस 55’ 1955 ला आला. याच्या संगीतानेही कमाल केली. ओ.पी.नय्यरने ‘आरपार’ हा केवळ अपवाद नसून आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले.  रफीची एक कमाल या चित्रपटात मानावी लागेल. त्याने गुरूदत्तला आणि जॉनी वॉकरला एकाचवेळी आवाज देताना त्यातील फरकाचे जे बारकावे दिलेत त्यातून संगीतकार आणि गायक दोघांचाही कस लागतो. जॉनी वॉकर साठी ‘जाने कहां मेरा जिगर गया जी’ सारखे गाणे तर गुरूदत्त साठी त्याच गीता दत्त सोबत ‘ उधर तूम हसी हो’ सारखे सदाबहार द्वंदगीत दिले आहे. ‘उधर तूम हसी हो’ ला बिनाकातही स्थान मिळाले. यातच रफीच्या वाट्याला ‘मेरी दुनिया लुट रही थी’ आणि ‘दिल पर हुआ ऐसा जादू’ ही अजून दोन गाणी आली आहेत.

दुसरा टप्पा (1957-1961) (राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त यांचे पदार्पण)
1957 साली ‘मदर इंडिया’ मुळे  पडद्यावर गाजलेले दोन अभिनेते म्हणजे राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त. यांच्या सोबतच गाजलेले तिसरे नाव म्हणजे शम्मी कपुर. शम्मीचा ‘तुमसा नही देखा’ याच वर्षी गाजला. मदर इंडिया स्त्रीप्रधान असल्याने राजेंद्र कुमार, सुनील दत्त यांच्या वाट्याला फारशी गाणी नव्हती पण शम्मीच्या वाट्याला मात्र भरपुर गाणी आली. ‘सर पे टोपी लाल हात मे रेशम का रूमाल’ (रफी-आशा) आणि ‘यू तो हमने लाख हसी देखे है’ (रफी) या दोन गाण्यांनी शम्मीची जी हवा बनली ती पुढे कित्येक वर्षे टिकली. शम्मी आणि रफी हे अद्वैत निर्माण झाले. पुढे चालून संगीतकार कधी बदलले पण रफीचा आवाज हाच शम्मीचा आवाज राहिला (अपवाद ‘उजाला’ ज्यात मन्ना व मुकेशचा आवाज शम्मीसाठी आहे). खरं तर सुरवातीला शम्मीसाठी तलत/हेमंतकुमार यांचेही आवाज वापरले गेले. ही गाणी बिनाकात हीटही झाली.  जावेद अख्तरचा मामा मजाज याची सुंदर कविता  ‘ए गमे दिल क्या करू’ ही तलतच्या आवाजात आहे. सरदार मलिकने अगदी हळूवार शब्दांना न्याय देत चाल बांधली आहे (चित्रपट -ठोकर 1953). शम्मीचे दुसरे गाजलेले गाणे हेमंत कुमारच्या आवाजातील ‘हलके हलके चलो सांवरे’(संगीत- सलिल चौधरी, तांगावाली- 1955). पण हे आवाज पुढे शम्मीचा म्हणून आवाज बनले नाहीत. ओ.पी.नय्यरने ‘हम सब चोर है’ (1956) मध्ये ‘ओ मि बेंजो इशारो तो समझो’ हे गाणं रफीच्या आवाजात शम्मीला दिलं. आशा भोसले सोबत यात रफीनं अशी काही कमाल केली की हे गाणं बिनाकात तर गाजलंच पण पुढे कायमस्वरूपी रफी म्हणजे शम्मीचा आवाज हेच समीकरण रूढ झालं. 

1957 नंतर राजेंद्रकुमार, शम्मी कपुर यांचे सिनेमे सातत्याने येत राहिले. त्यातली गाणीही गाजत राहिली. आधीच्या भारतभुषणची तर कारकीर्द बहरात होतीच, फागुन (1985), रानी रूपमती (1959), बरसात की रात (1960) आणि संगीत सम्राट तानसेन (1962) अशी ओळीने उत्तम गाणी असलेली चित्रपट येतच होते.

प्रदीपकुमारच्या वाट्यालाही नंतरच्या काळात घुंघट (1960), आरती (1962), ताजमहाल (1963) या चित्रपटांत चांगली गाणी आली होती.

गुरूदत्तचा सगळ्यात गाजलेला ‘प्यासा’ (1957) आला तो याच काळात. रफीच्या आवाजातील ‘हम आपकी आंखो मे’ असो किंवा हेमंतकुमारच्या आवाजातील ‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ असो आजही रसिकांच्या काळजात आढळ स्थान मिळवून आहेत. ‘प्यासा’ला सचिन देव बर्मनचा सांगितिक सुवर्णस्पर्श होता पण सोबतच साहिरची अभिजात लेखणीचेही पाठबळ होते. या चित्रपटाच्या यशामुळेच साहिर-सचिनदेव बर्मन संबंध बिघडले. 

साहिरचा कवी म्हणून इगो इतका मोठा झाला की गायक संगीतकारापेक्षा तो जास्त मानधन मागू लागला. यामुळे सुनील दत्त, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र यांच्या चित्रपटांना रवी, एन.दत्ता, जयदेव यांचे संगीत आणि साहिरची गीते अशी रचना दिसून येवू लागली. हे गुणी संगीतकार होतेच पण हे मानधनासाठी निर्मात्यांना अटी घालत नव्हते. दिलीप-देव-राज यांचे मानधन न परवडणारे निर्माते या नविन नटांना आणि इतर संगीतकारांना घेवून चित्रपट करायला लागले.

जॉनी वॉकर आता गुरूदत्तच्याच नव्हे तर इतरांच्या चित्रपटांतूनही स्थिरावत चालला होता. त्याच्या वाट्याला किमान एकतरी गाणं रफीच्या आवाजात असायचेच आणि ते गाणे गाजायचेही. त्यामुळे गाण्याचा विचार करताना जॉनी वॉकरचा एक नायक म्हणून विचार करावाच लागतो. 

1960 नंतर भारतभुषण, प्रदीपकुमार मागे पडत गेले. गुरूदत्तने आत्महत्या केली. आता जमाना सुरू झाला शम्मी कपुर आणि राजेंद्रकुमारचा. 

राजेंद्रकुमारला पहिला संगीतमय चित्रपट मिळाला तो म्हणजे वसंत देसाईंचे संगीत असलेला ‘गुंज उठी शहनाई’. ‘ओ हौले हौले चलो मोरे साजना’, ‘जीवन मे पिया तेरा साथ रहे’, ‘तेरी शहनाई बोले’ सारखी एकापेक्षा एक मधुर लता-रफीची द्वंद्व गीते यात होती. राजेंद्रकुमारवर दिलीपकुमारचा प्रचंड प्रभाव होता. याच चित्रपटात बिनाकात गाजलेले करूण रसातील विरही गीत ‘केह दो कोई ना करे यहा प्यार’ याची साक्ष देते. गरिब निर्मात्यांचा दिलीपकुमार अशी एक प्रतिमा राजेंद्रकुमारची तयार झाली. सोबतच तरूणांना आकर्षित करणारा तरूण ताजा चेहरा अशीही प्रतिमा होती. कारण याच वर्षी माला सिन्हा सोबतचा ‘धुल का फुल’ही प्रदर्शित झाला. ‘तेरे प्यार का आसरा’ सारखे महेंद्र कपुर-लता च्या आवाजातील गाणेही बिनाकाच्या हिट यादीत होते. 

राजेंद्रकुमारचे चिराग कहा रोशनी कहा (1959), घराना (1961), जिंदगी और ख्वाब (1961), आस का पंछी (1961), मेरे मेहबुब (1963), दिल एक मंदिर है (1963) गेहरा दाग (1963), संगम  (1964), जिंदगी (1964), आरजू (1966) असे सलग बॉक्स ऑफिस हिट चित्रपट येत गेले. इतके सातत्य शम्मी कपुर शिवाय कुठल्याच नायकाला दाखवता आले नाही. सलग हीट गाण्यांची राजेंद्रकुमारची बरोबरी केवळ शम्मी कपुरच करू शकला. 

शम्मी कपुरच्या ‘दिल दे के देखो’ नेही याच वर्षी (1959) धमाल केली होती. ‘दिल दे के देखो’ सारखे रफीचे गाणे हिट झाले पण त्याचा वेगळाच फटका संगीतकार उषा खन्ना हीला मिळाला. इतकं चांगलं संगीत म्हणजे ओ.पी.नय्यरनेच आपल्या या भाच्चीच्या नावाने दिले असा गैरसमज पसरला. शम्मीची कारकीर्द पुढे चमकली पण उषा खन्नाला मात्र फारसे चित्रपट मिळाले नाहीत.

किशोरकुमारचा ‘चलती का नाम गाडी’ गाडी याच काळात आला होता. देवआनंद साठीच्या आपल्या मस्तीखोर गाण्याने तशीही किशोरने धूम केली होतीच. पण नायक म्हणून ‘चलती का नाम’ मधून मात्र एक वेगळीच उंची त्याच्या गाण्यांना लाभली. एक तर त्याचे हे होम प्रॉडक्शन. शिवाय मधुबाला सारखी लावण्यवती सोबत. संगीत एस.डी.बर्मन सारख्या दादा माणसाचे. ‘इक लडकी भिगी भागीसी’, ‘हाल कैसा है जनाब का’ आणि ‘बाबू समझो इशारे’ ही किशोरची तिनही गाणी बिनाकात हिट ठरली.

गुरूदत्तचे ‘चौदहवी का चांद’, ‘कागज के फुल’ या काळात येवून गेले. त्यांना फारसे व्यवसायीक यश लाभले नाही. पण दोन्हीतली गाणी मात्र गाजली. ‘चौदहवी का चांद हो’ या शीर्षक गीताने तर कमाल केली. याच चित्रपटात जॉनी वॉकर साठी ‘मेरा यार बना है दुल्हा’ रफीने गायले होते. या दोन्ही गाण्यांना बिनाकात स्थान मिळाले. शिवाय रफीच्याच आवाजातील विरह गीत ‘मिली खांक मे मुहोब्बत’ हेही बिनाकात होतं.

तिसरा टप्पा (1961-1970) (धर्मेंद्र, मनोज कुमार यांचे पदार्पण)

एव्हाना राजेंद्र कुमार व शम्मी कपुर यांची कारकीर्द स्थीर होत चालली होती. शम्मी कपुरचे सलग जंगली (1961), प्रोफेसर (1962), दिल तेरा दिवाना (1962), चायना टाऊन (1962), राजकुमार (1964), कश्मीर की कली (1964), जानवर (1965) आणि तिसरी मंझील (1966) असे एकापेक्षा एक बॉक्स ऑफिसवर यशस्वी चित्रपट येत होते.

सुनील दत्तची कारकीर्दही या काळात स्थिरावलेली दिसून येते. त्याच्या चित्रपटांतील गाण्यांना एक विशिष्ट दिशा सापडली होती. रवी चे संगीत, महेंद्र कपुरचा आवाज असा एक तो कालखंड होता. गुमराह (1963), मुझे जीने दो (1963), वक्त (1965), खानदान (1965), मेरा साया (1966), हमराज (1967). 

या काळातच दोन नायकांचे पदार्पण या काळात झाले. ‘शोला और शबनम’ (1961) मध्ये धर्मेंद्र आणि ‘हरियाली और रास्ता’ (1962) मध्ये मनोजकुमार यांना पहिल्यांदा व्यवसायीक यश अनुभवाला मिळालं.

धर्मेंद्र ची पुढे हीमॅन म्हणून जी इमेज तयार झाली त्याच्या अगदी विरोधी अशी ही सुरवातीच्या काळातील इमेज आहे. या त्याच्या चित्रपटांतील प्रेमगीतांना तेंव्हा रसिकांनी चांगली पसंतीही दिली होती. पण पुढे  चित्रपटांतून संगीतच हद्दपार व्हायला लागले शिवाय धर्मेंद्र मधला पंजाबी मल्ल उफाळून वर आला. परिणामी मारधाड वाढून अवीट गोडीची गाणी त्याच्या चित्रपटांतून कमी होत गेली. या काळात अनपढ (1962), बंदिनी (1963), आयी मिलन की बेला (1964), हकिकत (19964), काजल (1965), फुल और पत्थर (1966), आये दिन बहार के (1966), आंखे (1968), शिकार (1968), जीने की राह (1969), आया सावन झुम के (1969), यकिन (1969) असे त्याचे यशस्वी चित्रपट येत गेले. यातली गाणीही चांगली होती. पण 1966 नंतर गाण्यांचा दर्जाच घसरत गेला. 

मनोजकुमारची ‘शहिद’ पासूनच  ‘मि. भारतकुमार’ ही प्रतिमा झाली होती.  सोबतच या काळात काही चांगले प्रेम गीतांचे संगीतमय चित्रपट आले. ज्याप्रमाणे सुनील दत्त-संगीतकार रवी-गायक महेंद्र कपुर असे एक सुत्र आढळते तसेच मनोज कुमार-संगीतकार कल्याणजी आनंदजी-मुकेश असेही एक सुत्र या काळात आढळते. राज कपुर नंतर मुकेशचा आवाज अगदी ज्याची ओळख म्हणून वापरला गेला असा अभिनेता म्हणजे मनोजकुमारच. ‘हरियाली और रास्ता’ (1962) मधून त्याची गाणी पहिल्यांदा गाजली. ‘बोल तेरे तकदीर मे क्या है’ आणि ‘इब्तेदा ए इश्क मे हम’ ही दोन्ही लता-मुकेशची युगल गीतं भरपुर गाजली. बिनाकाने त्यांच्यावर शिक्कामोर्तबही केलं. अर्थात  या चित्रपटाच्या यशात नायक नायिका यांच्यापेक्षा संगीतकार शंकर जयकिशनच्या प्रतिमेचा एक मोठा वाटा होता. एव्हाना शंकर जयकिशन एक स्टार संगीतकार म्हणून शिखरावर पोचले होते.

मनोज कुमारचे ‘हरियाली और रास्ता’ नंतर पुढे ‘वो कौन थी’ (1964), हिमालय की गोद मे (1965), गुमनाम (1965), दो बदन (1966), सावन की घटा (1966), पत्थर के सनम (1967), नीलकमल (1968), आदमी (1968) असे चित्रपट येत गेले. यांना चांगले व्यावसायीक यशही मिळाले. पुढे  पुरब और पश्चिम (1970) पासून त्याची ‘मि. भारतकुमार’ ही प्रतिमा ठळक  बनली.

भारतभुषण, प्रदीपकुमार, किशोरकुमार, गुरूदत्त, राजेंद्रकुमार, शम्मी कपुर, सुनील दत्त, मनोजकुमार आणि धर्मेंद्र यांची नायक म्हणून एक कारकीर्द सगळ्यांच्या समोर आहे. त्यांची गाणीही गाजली. पण जॉनी वॉकर मात्र असा एकमेव नट आहे की जो कधीच चित्रपटाचा मुख्य नायक नव्हता पण तरीही त्याची गाणी गाजली. काही प्रमाणात असं यश मेहमुदलाही लाभलं. पण तरी त्यात जॉनी वॉकर इतकं सातत्य नाही. जॉनी वॉकरचं पहिलं गाणं ‘आरपार’ मधलं आहे ‘अरे ना ना ना तौबा तौबा’, पुढे ‘जाने कहा मेरा जिगर गया जी’ (मि. ऍण्ड मिसेस 55), ‘ए दिल है मुश्किल’ (सी.आय.डी.), ‘सर जो तेरा चकराये’(प्यासा’), ‘ऑल लाईन क्लिअर’ (चोरी चोरी), ‘जंगल मे मोर नाचा’ (मधुमती) अशी एक मालिकाच सुरू होते. केवळ ओ.पी.नय्यर सारख्या एखाद्याच संगीतकारापुरतीच ही गोष्ट मर्यादीत नव्हती. एस.डि. बर्मन, सी. रामचंद्र, सलिल चौधरी, शंकर जयकिशन, रवी, मदन मोहन, दत्तराम वाडकर, एन. दत्ता, रोशन अशा जवळपास सगळ्याच महत्वाच्या संगीतकारांनी त्याच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण गाणी चित्रपटांत रचली.

याच काळातील विश्वजीत आणि जॉय मुखर्जी यांचीही दखल घ्यायला हवी. पण त्यांचे चित्रपट फार संख्येने आले नाहीत. शिवाय त्यांना मनोजकुमार आणि धर्मेंद्र यांच्या प्रमाणे व्यवसायीक यश मिळालेही नाही.
दिलीप-देव-राज यांच्या काळातच तीन टप्प्यांतून दहा नायक पुढे आले. त्यांची गाणी या महानायकांची गाणी गाजत असतानाच लोकांनी डोक्यावर घेतली. या काळात सी.रामचंद्र, नौशाद, शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, ओ.पी.नय्यर यांच्यासारखी संगीतकारांमधील स्टारपदाला पोचलेली माणसे गाजत होती. स्टार नसलेल्या नायकांचे चित्रपट गाजविण्यात या स्टार संगीतकारांचा वाटा मोठा आहे. 

पण या काळातच इतरही संगीतकार जे की गुणी होते पण त्यांना व्यवसायीक दृष्ट्या स्टारपद नाही मिळालं. त्यांचीही गाणी गाजत होती. त्यात मदनमोहन, रवी, हेमंतकुमार, जयदेव, खय्याम, रोशन, वसंत देसाई, उषा खन्ना, एस.एन.त्रिपाठी, चित्रगुप्त, सलिल चौधरी, गुलाम मोहम्मद यांचाही उल्लेख करावा लागेल. 

मनोजकुमार, धर्मेंद्र यांच्या कारकीर्दीला सुरवातीच्या काळात कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासारख्या नव्या दमाच्या संगीतकारांनी आपल्या गाण्यांनी तारले.

शंकर जयकिशनसोबत शम्मी कपुर ची गाणी तुफान गाजत असतानाच्या काळातच त्याचा आर.डी. बर्मननी संगीतबद्ध केलेला ‘तिसरी मंझील’ आला आणि हिंदी संगीताची दिशाच बदलली. या सोबतच ‘बहारोंके सपने’ मधून राजेश खन्ना पुढे आला होता. पुढे ‘आराधना’ मधून त्याच्या स्टारपदावर शिक्कामोर्तब झाले. राजेश खन्ना सोबत मनोज कुमार आणि धर्मेंद्र शिवाय जून्यापैकी कुणीच टिकू शकले नाही.  ‘अंदाज’ (1971) मध्ये ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ म्हणत मोटार सायकल वर हेमा मालीनीसोबत राजेश खन्नाने  धुम केली होती. त्यात शम्मी कपुर होता पण भाव खावून गेला राजेश खन्ना. यातच सगळं काही आलं.

(दहा नायकांच्या चित्रपटांतील काही महत्त्वाची दखलपात्र गाणी खाली दिली आहेत. ही यादी तयार करताना प्रामुख्याने व्यावसायीक गाजलेल्या चित्रपटांतील गाणी आणि बिनाकाच्या यादीतील सरताज गाणी यांचाच विचार केला आहे. संख्येने जास्त गाणी आढळली तिथे अपरिहार्यपणे इतर गाणी अवीट गोडीची असूनही वगळली आहेत. शम्मी कपुर आणि राजेंद्रकुमार यांची गाणी इतक्या मोठ्या संख्येने बिनाका सरताज गीते बनली आहेत की त्याशिवायची गाणी संख्येच्या मर्यादेमुळे देता आली नाहीत. * केलेली गाणी बिनाका सरताज गीते आहेत.)

भारतभुषण
1. मन तडपत हरी दर्शन को-रफी-शकिल-नौशाद-बैजू बावरा (1952)
2. ओ दुनिया के रखवाले-रफी-शकिल-नौशाद-बैजू बावरा
3. तू गंगा मी मौज मै-रफी/लता-शकिल-नौशाद-बैजू बावरा
4. झूले मे पवन की-रफी/लता-शकिल-नौशाद-बैजू बावरा
5. दिले नादान तुझे हुआ क्या है-सुरैय्या/तलत-गालिब-गुलाम मोहम्मद-मिर्झा गालिब (1954)
6.*बडी देर भयी-रफी-शैलेंद्र-शंकर जयकिशन-बसंत बहार (1956)
7. सूर ना सजे-मन्ना-शैलेंद्र-शंकर जयकिशन- बसंत बहार
8.*नैन मिले चैन कहा-मन्ना/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-बसंत बहार
9. दो घडी वो पास आ बैठे-रफी/आशा-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन- गेट वे ऑफ इंडिया (1957)
10.*एक परदेसी मेरा दिल ले गया-रफी/आशा-कमर जलालाबादी-ओ.पी.नय्यर-फागुन (1958)
11.*आ लौट के आजा मेरे मीत-मुकेश/लता-भरत व्यास-एस.एन.त्रिपाठी-रानी रूपमती (1959)
12.*जिंदगीभर नही भूलेगी-रफी/लता-साहिर-रोशन-बरसात की रात (1960)
13. झुमती चली हवा-मुकेश-शैलेंद्र-एस.एन.त्रिपाठी-संगीत सम्राट तानसेन (1962)
14.*दिल की तमन्ना थी मस्ती-रफी/आशा-मजरूह-एन.दत्ता-ग्यारा हजार लडकिया (1962)

प्रदीप कुमार
1. वंदे मातरम-हेमंत-बकिंमचंद्र-हेमंतकुमार-आनंदमठ (1951)
2. जिंदगी प्यार की दो चार-हेमंत-राजेंद्रकृष्ण-सी.रामचंद्र-अनारकली (1953)
3. तेरे द्वार खडा एक जोगी-हेमंत-राजेंद्रकृष्ण- हेमंतकुमार-नागिन (1954)
4. अरी छोड रे पतंग-हेमंत/लता-राजेंद्रकृष्ण- हेमंतकुमार-नागिन (1954)
5. ये वादा करो चांद के सामने-मुकेश/लता- शैलेंद्र-शंकर जयकिशन-राजहठ (1956)
6.*अब क्या मिसाल दू-रफी-मजरूह-रोशन-आरती (1962)
7.*आपने याद दिलाया-रफी/लता-मजरूह-रोशन-आरती
8.*जो वादा किया वो-रफी/लता-साहिर-रोशन-ताजमहाल (1963)
9.*पांव छू लेने दो-रफी/लता-साहिर-रोशन-ताजमहाल
10.*गया अंधेरा हुआ उजारा-तलत-नूर लखनवी-सी.रामचंद्र-सुबह का तारा (1954)
11.*आजा जरा मेरे-हेमंत/गीता-एस.एच.बिहारी-हेमंतकुमार-एक झलक (1957)
12.*तूम चल रहे हो-मुकेश/लता-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-दुनिया ना माने (1959)
13.*लागी मनवा के बीच कटारी-मन्ना-साहिर-रोशन-चित्रलेखा
14.*जिस दिल मे बसा था मुकेश-इंदिवर-क.आनंदजी-सहेली (1965)
15.*हम इंतजार करेंगे कयामत तक-रफी/लता-साहिर-रोशन-बहुबेगम (1967)

किशोर कुमार
1. शादी, किस्मत की बात है-किशोर-राजेंद्रकृष्ण-सुदर्शन धानीराम-लडकी (1953)
2. कमाता हु बहोत कुछ-किशोर/गीता-राजा मे. अली-अविनाश व्यास-अधिकार (1954)
3. तिकडम बाजी-किशोर-नीलकंठ तिवारी-अविनाश व्यास-अधिकार
4. नखरेवाली देखने मे-किशोर-शैलेंद्र-शंकर जयकिशन-न्यू दिल्ली (1956)
5.*दिल दिल से मिलाकर देखो-किशोर-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-मेमसाहिब (1956)
6.*मुन्ना बडा प्यारा-किशोर-शैलेंद्र-सलिल चौधरी-मुसाफिर (1957)
7.*इना मिना डिका-किशोर-राजेंद्रकृष्ण-सी.रामचंद्र-आशा (1957)
8.*इक लडकी भिगी भागीसी-किशोर-मजरूह-एस.डि.बर्मन-चलती का नाम गाडी (1958)
9.*हाल कैसा है जनाब का-किशोर/आशा-मजरूह-एस.डि.बर्मन-चलती का नाम गाडी
10.*बाबू समझो इशारे-मन्ना/किशोर-मजरूह-एस.डि.बर्मन-चलती का नाम गाडी
11.*सी ए टी कॅट-किशोर-मजरूह-रवी-दिल्ली का ठग
12.*सुरमा मेरा निराला-किशोर-मजरूह-ओ.पी.नय्यर-कभी अंधेरा कभी उजाला (1958)
13.*मै बंगाली छोकरा-किशोर/आशा-जांनिसार अख्तर-ओ.पी.नय्यर-रागिणी (1958)
14.*हम मतवाले नौजवां-किशोर-हसरत-शंकर जयकिशन-शरारत (1959)
15.*जरूरत है जरूरत है-किशोर-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-मनमौजी (1962)
16.*मचलती हुई हवा मे छम छम-किशोर/लता-मजरूह-चित्रगुप्त-गंगा की लहरे(1964)
17.*मेरे महबुब कयामत होगी-किशोर-आनंद बक्षी-लक्ष्मी प्यारे-मि.एक्स इन बॉम्बे (1964)
18.*अजनबी तुम जाने पहचाने-किशोर-असद भोपाली-लक्ष्मी प्यारे-हम सब उस्ताद है (1965)
19.*दिन जवाने के चार यार-किशोर-राजेंद्रकृष्ण-लक्ष्मी प्यार-प्यार किये जा (1966)

गुरूदत्त
1. सून सून जालिमा-गीता/रफी-मजरूह-ओ.पी.नय्यर-आरपार (1954)
2. मोहब्बत करलो जी भरला-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-आरपार
3.*उधर तूम हसी हो-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55 (1955)
4. चल दिये बंदा नवाज-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55
5. दिल पर हुआ एैसा जादू-रफी-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55
6. ये महलों ये तख्तो-रफी-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा (1955)
7. जाने वो कैसे लोग थे जिनके-हेमंत-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा
8. जिन्हे नाज है हिंद पर वो-रफी-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा
9. हम आपकी आंखो मे-रफी/गीता-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा
10. तूम जो हुये मेरे हमसफर-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-12 ओ क्लॉक (1958)
11. देखी जमाने की यारी-रफी-कैफी आझमी-एस.डि.बर्मन-कागज के फुल (1959)
12.*चौदहवी का चांद हो-रफी-शकिल-रवी-चौदहवी का चांद (1960)
13.*मिली खांक मे मुहोब्बत-रफी-शकिल-रवी-चौदहवी का चांद
14. उम्र हुई तूमसे मिले-हेमंत/लता-साहिर-सी.रामचंद्र-बहुरानी (1963)
15. आज की मुलाकात-लता/महेंद्र-राजेंद्रकृष्ण-रवी-भरोसा (1963)

जॉनी वॉकर
1. अरे ना ना तौबा-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-आरपार (1954)
2. जाने कहा मेरा-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-मि.ऍण्ड मिसेस 55 (1955)
3.*ए दिल है मुश्किल है-रफी/गीता-मजरूह-ओ.पी.नय्यर-सी.आय.डी. (1956)
4. ऑल लाईन क्लिअर-रफी-हसरत-शंकर जयकिशन-चोरी चोरी (1956)
5.*सर जो तेरा चकराये-रफी-साहिर-एस.डि.बर्मन-प्यासा (1957)
6.* मै बंबई का बाबू नाम मेरा-रफी-साहिर-ओ.पी.नय्यर-नया दौर (1957)
7. जंगल मे मोर नाचा-रफी-शैलेंद्र-सलिल चौधरी-मधुमती (1958)
8.*मै मै कार्टून-शम/रफी/आशा-हसरत-ओ.पी.नय्यर-मि.कार्टून एम ए (1958)
9.*बडा ही सी.आय.डी. है-रफी-राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-चंदन (1958)
10. कडकी तेरा नामही कलरकी-आशा/रफी-फारूख कैसर-रोशन-अजी बस शुक्रिया (1958)
11. हम तुम जिसे केहते है शादी -रफी-कैफी आझमी-एस.डि.बर्मन-कागज के फुल (1959)
12.*मेरा यार बना है दुल्हा-रफी-शकिल-रवी-चौदहवी का चांद (1960)
13.*हम भी अगर बच्चे होते-रफी-शकिल-रवी-दूर की आवाज (1964)
14. सुनो सुनो मिस चॅटर्जी-रफी/आशा-अंजान-ओ.पी.नय्यर-बहारे फिर भी आयेगी (1966)

राजेंद्र कुमार
1.*आजा जरा मेरे-हेमंत/गीता-एस.एच.बिहारी-हेमंतकुमार-एक झलक (1957)
2.*तेरे प्यार का आसरा-लता/महेंद्र-साहिर-एन.दत्ता-धूल का फुल (1959)
3.*धडकने लगे दिल के-आशा/महेंद्र-साहिर-एन.दत्ता-धूल का फुल
4.*बिखर गये बचपन के-रफी-भरत व्यास-वसंत देसाई -गुंज उठी शहनाई
5.*मैने पिना सिख लिय-रफी-भरत व्यास-वसंत देसाई-गुंज उठी शहनाई
6.*तूम रूठी रहो मै मनाता रहू-मुकेश/लता-हसरत-शंकर जयकिशन-आस का पंछी (1961)
7.*दिल तेरा एक आस का पंछी-सुबीर सेन-हसरत-शंकर जयकिशन-आस का पंछी
8.*तेरी प्यारी प्यारी सुरत को-रफी-हसरत-शंकर जयकिशन- ससुराल (1961)
9.*इक सवाल मै करू-रफी/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-ससुराल
10.*हुस्नवाले तेरा जवाब नही-रफी-शकिल-रवी-घराना (1961)
11.*मेरे मेहबुब तूझ-रफी-शकिल-नौशाद-मेरे मेहबुब (1963)
12.*दिल एक मंदिर है-रफी/सुमन-हसरत-शंकर जयकिशन-दिल एक मंदिर है
13.*तूम कमसिन हा-रफी-हसरत-शंकर जयकिशन-आयी मिलन की बेला (1964)
14.*प्यार आखों से जताया-रफी-हसरत-शंकर जयकिशन-आयी मिलन की बेला
15.*ये मेरा प्रेमपत्र पढकर-रफी-हसरत-शंकर जयकिशन-संगम (1964)
16.*दोस्त दोस्त ना रहा-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-संगम
17.*छलके तेरी आंखो से-रफी-हसरत-शंकर जयकिशन-आरजू (1965)
18.*बहारों फुल बरसाओ मेरा मेहबुब-रफी-हसरत-शंकर जयकिशन-सुरज (1966)

शम्मी कपुर
1.*ए गमे दिल क्या करू-तलत-मजाज-सरदार मलिक-ठोकर (1953)
2.*हलके हलके चलो सांवरे-हेमंत/लता-प्रेम धवन-सलिल चौधरी-तांगावाली (1955)
3.*ओ मि बेंजो इशारो तो रफी/आशा-मजरूह-ओ.पी.नय्यर-हम सब चोर है (1956)
4.*सर पे टोपी लाल हाथ मे-रफी/आशा-मजरूह-ओ.पी.नय्यर-तूमसा नही देखा (1957)
5.*यू तो हमने लाख हसी देखे है-रफी-साहिर-ओ.पी.नय्यर-तूमसा नही देखा
6.*दिल दे के देखो-रफी/आशा-मजरूह-उषा खन्ना-दिल दे के देखो (1959)
7.*बडे है दिल के काले-रफी/आशा-मजरूह-उषा खन्ना-दिल दे के देखो
8.*बोलो बोलो कुछ ता-रफी-मजरूह-उषा खन्ना-दिल दे के देखा
9.*झुमता मौसम मस्त नजारा-मन्ना/लता-हसरत-शंकर जयकिशन-उजाला (1960)
10.*ये शहर बडा अलबेला-मुकेश-शैलेेंद्र-शंकर जयकिशन-सिंगापोर (1960)
11.*एहसान तेरा होगा मुझपे-रफी-हसरत-शंकर जयकिशन-जंगली (1961)
12.*याहू चाहे कोई मुझे जंगली कहे-रफी-शैलेंद्र-शंकर जयकिशन-जंगली
13.*आवाज दे के-रफी/लता-हसरत-शंकर जयकिशन-प्रोफेसर (1962)
14.*ए गुलबदन-रफी-हसरत-शंकर जयकिशन-प्रोफेसर
15.*दिल तेरा दिवाना है-रफी/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-दिल तेरा दिवाना (1962)
16.*गोविंदा आला रे आला-रफी-राजेंद्रकृष्ण-क.आनंदजी-ब्लफ मास्टर (1963)
17.*जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल-रफी-शकिल-रवी-प्यार कीया तो डरना क्या (1963)
18.*ये चांद सा रोशन चेहरा-रफी-एस.एच.बिहारी-ओ.पी.नय्यर-कश्मिर की कली (1964)
19.* तुमसे अच्छा कौन ह-रफी-हसरत-शंकर जयकिशन-जानवर (1965)
20.*लाल छडी मैदान खडी-रफी-शैलेंद्र-शंकर जयकिशन-जानवर
21.*ओ हसिना जुल्फोवाली-रफी/आशा-मजरूह-आर.डि.बर्मन-तिसरी मंझिल (1966)
22.*आजा आजा मै हू प्यार तेरा-रफी/आशा-मजरूह-आर.डि.बर्मन-तिसरी मंझिल

सुनील दत्त
1. संभल ए दिल-रफी/आशा-साहिर-एन.दत्ता-साधना (1958)
2.*जलते है जिसके लिये-तलत-मजरूह-एस.डि.बर्मन-सुजाता (1959)
3.*चांदसा मुखडा क्यू शरमाया-रफी/आशा-शैलेंद्र-एस.डि.बर्मन-इन्सान जाग उठा (1959)
4.*मतवाली नार-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-एक फुल चार कांटे (1960)
5.*छोडो कल की बाते-मुकेश-प्रेम धवन-उषा खन्ना-हम हिंदुस्थानी (1960)
6.*इतना ना मुझसे तू प्यार-तलत/लता-राजेंद्रकृष्ण-सलिल चौधरी-छाया (1961)
7.*मै कौन हू मै कहा हू-रफी-राजेंद्रकृष्ण-चित्रगुप्त-मै चुप रहूंगी (1962)
8.*चलो एक बार फिरसे-महेंद्र-साहिर-रवी-गुमराह (1963)
9.*इन हवाओं मे-आशा/महेंद्र-साहिर-रवी-गुमरा
10.*ये वादिया ये फिजाये-रफी-साहिर-रवी-आज और कल (1963)
11. अब कोई गुलशन ना उजडे-रफी-साहिर-जयदेव-मुझे जिने दो (1963)
12*मैने देखा है की फुलों से लदी-आशा/महेंद्र-साहिर-रवी-वक्त (1965)
13.*ओ बडी देर भयी नंदलाला-रफी-राजेंद्रकृष्ण-रवी-खानदान (1965)
14.*नील गगन पर उडते बादल-रफी/आशा-राजेंद्रकृष्ण-रवी-खानदान
15. आप के पहलू मे आके -रफी-रा.मेहदी अली-मदनमोहन-मेरा साया (1966)

धर्मेंद्र
1.*मुझको इस रात की तनहाई -मुकेश-शमिम जयपुरी-क.आनंदजी-दिल भी तेरा हम भी तेरे (1960)
2. जीत ही लेंगे बाजी हम तूम-रफी-कैफी आझमी-खय्याम-शोला और शबनम (1961)
3.*ओ जानेवाले हो सके-मुकेश-शैलेंद्र-एस.डि.बर्मन-बंदिनी (1963)
4. कर चले हम फिदा-रफी-कैफी आझमी-मदनमोहन-हकिकत (1964)
5. येही है तमन्ना -रफी-रा.मेहदी अली-मदनमोहन-आप की परछाई (1964)
6. तूम्हे जिंदगी के उजाले-मुकेश-गुलजार-क.आनंदजी- पुर्णिमा (1965)
7. हम सफर मेरे हमसफर-मुकेश/लता-अंजान-क.आनंदजी-पुर्णिमा
8. रहे ना रहे हम -रफी/सुमन-मजरूह-रोशन-ममता (1965)
9.*ये कली जब तलक फुल-लता/महेंद्र-आनंद बक्षी-लक्ष्मी प्यारे-आये दिन बहार के (1966)
10.*मेरे दुष्मन तू मेरी दोस्ती-रफी-आनंद बक्षी-लक्ष्मी प्यारे-आये दिन बहार के
11.*बदल जाये अगर माली-महेंद्र-कैफी आझमी-ओ.पी.नय्यर-बहारे फिर भी आयेगी (1966)
12.*बहारों ने मेरा चमन-मुकेश-आनंद बक्षी-रोशन-देवर (1966)
13.*काजलवाले नैन मिलाके-रफी-आनंद बक्षी-रोशन-देवर
14.*दिल ने फिर याद किया-मुकेश/रफी/सुमन-जी.एस.रावेल-सोनिक ओमी-दिल ने फिर याद किया (1966)
15े.*कलियो ने घुंघट खोला-रफी-जी.एस.रावेल-सोनिक ओमी-दिल ने फिर याद किया

मनोजकुमार
1. जुल्फों की घटा लेकर-मन्ना/आशा-राजा मे.अली-बाबुल-रेश्मी रूमाल (1961)
2. साथ हो तूम और रात जवां-मुकेश/आशा-शैलेंद्र-सुहरीद कार-कांच की गुडिया (1961)
3. बागों मे खिलते फूल-तलत/लता-राजेंद्रकृष्ण-चित्रगुप्त-सुहाग सिंदूर (1961)
4. चांदी का गोल गोल चंदा-रफी/लता-भरत व्यास-एस.एन.त्रिपाठी-पिया मिलन की आस (1961)
4.*बोल तेरे तकदिर मे क्या-मुकेश/लता-शैलेंद्र-शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता (1962)
5.*इब्तदा ए इश्क मे हम-मुकेश/लता-हसरत -शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता
6. तेरी याद दिल से-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता
7. लाखो तारे आसमान मे-मुकेश-शैलेंद्र-शंकर जयकिशन-हरियाली और रास्ता
8. ए दिल ए आवारा चल-मुकेश-मजरूह-एस.डि.बर्मन-डॉ. विद्या (1962)
9. छोडकर तेरे प्यार का-लता/महेंद्र-रा.मेहदी अली-मदनमोहन-वो कौन थी (1964)
10.गगन के चंदा-लता/सुबीर-शैलेंद्र-शंकर जयकिशन-अपने हुये पराये (1964)
11.*चांद सी मेहबुबा हो मेरी कब-मुकेश-आनंद बक्षी-क.आनंदजी-हिमालय की गोद मे (1965)
12. मै तो इक ख्वाब हू-मुकेश-क.जलालाबादी- क.आनंदजी-हिमालय की गोद मे
14. जाने चमन शोला बदन-रफी/शारदा-शैलेंद्र-शंकर जयकिशन-गुमनाम (1965)
15. ए वतन ए वतन-रफी-प्रेम धवन-प्रेम धवन-शहीद (1965)
16. ओ मेरा रंग दे बसंती-मुकेश/महेंद्र-प्रेम धवन-प्रेम धवन-शहीद
17. सरफरोशी की तमन्ना-मन्ना/रफी-रामप्रसाद-प्रेम धवन-शहीद
18. रहा गर्दिशो मे हर दम-रफी-शकिल-रवी-दो बदन (1966)
19. होठों पे हसी आंखो मे नशा-रफी/आशा-एस.एच.बिहारी-ओ.पी.नय्यर-सावन की घटा (1966)
20. जूल्फों को हटा ले-रफी-एस.एच.बिहारी-ओ.पी.नय्यर-सावन की घटा

Friday 9 November 2018

दस नंबरी नायिका सौ नंबरी गाणी


मोहनगरी दिवाळी 2018

गाणार्‍या नट नट्यांना मोठी लोकप्रियता लाभण्याचा तो काळ होता.  नायकांमध्ये सैगल आणि नायिकांमध्ये नुरजहां हे सगळ्यात गाजलेले. केवळ पार्श्वगायन करणारं तेंव्हा एक शमशाद चा सणसणीत अपवाद वगळला तर कुणी नव्हतं. इतकंच काय रेकॉर्डवर गायिका म्हणून नायिकेचेच चित्रपटातील नाव (किंवा नायकाचे) छापलेले असायचे. पण सैगलचे निधन झाले आणि नुरजहां भारत सोडून पाकिस्तानात निघून गेली. स्वत:साठी स्वत: गाणे बाजूला पडून पार्श्वगायनाची पद्धत रूजत चालली. 

पार्श्वगायिका म्हणून लताचे आगमन 45 च्या सुमारास झाले. लताच्या आवाजात ज्या नायिकांच्या पिढीला आपला सूर सापडला त्यातले पहिले मोठे नाव म्हणजे नर्गिस. तिच्या सोबत आणि पाठोपाठ आलेली नावे म्हणजे गीताबाली (बडी बेहन-49),  मधुबाला (महल-49), मीनाकुमारी (बैजू बावरा-52) आणि वैजयंतीमाला (बहार-51). या पाच नायिकांचे चित्रपट 1949 ते 1952 या काळात बॉक्स ऑफिसवर गाजायला सुरवात झाली. तेंव्हाच्या वैशिष्ट्या प्रमाणे चित्रपटांच्या यशात गाण्यांचा मोठा वाटा होता. किंबहूना आज तर असे लक्षात येते की तेंव्हाचे बरेच चित्रपट हे केवळ गाण्यांमुळे गाजले. 

या पाच नायिकांच्या पाठोपाठ 1955 च्या ‘सीमा’च्या यशापासून नुतन, वहिदा (सीआयडी-56), मालासिन्हा (प्यासा-57), आशा पारेख (दिल देके देखो-59) आणि साधना (लव्ह इन सिमला-60) अशा अजून पाच नायिका पडद्यावर राज्य करू लागल्या. 

या दहा नायिकांचा प्रभाव पुढे जवळपास 1970 पर्यंत हिंदी चित्रपटांवर राहिला. 1949 ते 1966 या काळात एकूण 178 सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. या पैकी 110 म्हणजे 62 टक्के चित्रपट या दहा जणींचे आहेत. यावरून यांचा प्रभाव लक्षात येतो. बिनाकातील 414 गाण्यांपैकी 115 गाणी यांचीच आहेत.  

लताचा आवाज नायिकांसाठी वापरला जावू लागला ही बदलाची सुरवात होती. पण सुरवातीच्या पाचही नायिकांसाठी त्या काळाची सगळ्यात जास्त बिदागी घेणारी गायिका शमशाद बेगम हीच्या आवाजाचा वापर केला गेला आहे. नर्गिस- धडके मेरा दिल (बाबुल-50, सं.नौशाद), गीताबाली- चांदनी बनके आयी प्यार (दुलारी-49, सं. नौशाद), मधुबाला- मुहोब्बत मेरी रंग लाने (निराला- 50, सं. सी.रामचंद्र), मीनाकुमारी-पगडी पेहनके (मदहोश-51, सं.मदनमोहन) आणि वैजयंतीमाला- सैंय्या दिल मे आना रे (बहार-51, सं.सचिनदेव बर्मन) या गाण्यांमध्ये शमशादचा आवाज या नायिकांसाठी  वापरला गेला होता. 

पण बघता बघता हे चित्र पलटत गेलं. लताचा/गीताचा आवाज नायिकांसाठी उमटायला लागला. लताच्या ज्या गाण्यांनी सुरवातीलाच सगळ्यांना मोहून टाकले ते नर्गिससाठीचे गाणे होते बरसात मधील ‘मुझे किसीसे प्यार हो गया’. मधुबालाच्या महल मधल्या ‘आयेगा आयेगा आनेवाला’ ने तर कहरच केला. यापाठोपाठ गीताबाली साठी सचिनदेव बर्मन यांनी ‘बाजी’ (51) मध्ये गीता रॉयला गायला लावलं. ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर’ म्हणत गीता जे गायली त्यानं एकूण संगीताचीच तकदीर बदलून गेली. शमशादच्या आवाजात ‘सैंय्या दिल मे आना रे’ म्हणत अप्रतिम नृत्य करणार्‍या वैजयंतीमालासाठी लता ‘मन मोर मचावे शोर’ (लडकी-53) गायला लागली होती. पुढच्याच वर्षी वैजयंतीमालाच्या ‘नागिन’ मधील लताच्या सर्वच गाण्यांनी कहरच केला.   

राज कपुरच्या ‘बरसात’ मध्ये शंकर जयकिशनने नविन संगीत देवून बदलाची सुरवात केली. या सोबतच लताचा कोवळा आवाज नविन पिढीच्या नायिकांसाठीचा सूर बनला. पूर्वीचे संगीत आणि ‘बरसात’ (1949) नंतरचे संगीत यात फरक आढळतो. लताच्या आवाजामुळे असेल कदाचित पण सुरांचे बारकावे जे पूर्वी ऐकायला मिळत नव्हते ते कानावर पडायला लागले. संगीतकार विविध प्रयोग करायला लागले. हे सगळं नविन आणि वेगळं होतं. तिकडे नायकांसाठीही रफी, मुकेश यांच्या आवाजाचे प्रयोग सुरू झाले होते. किशोर बराच काळ स्वत:साठीच गात होता. देवआनंदचा अपवाद वगळता 1960 पर्यंत त्याची गाणी इतर नायकांसाठी फारशी नाहीतच. 

गीतकारांबाबतही याच काळात बदलाचे युग सुरू झाले. जून्या गीतकारांना बाजूला ठेवत नविन गीतकारांची पिढी समोर आलेली आढळते. म्हणजे हा असा कालखंड आहे की जिथे गायक नट-नट्या यांचा जमाना संपून पार्श्वगायकांचा वापर सुरू झाला होता सोबतच संगीताचा बाज बदलत होता. गीतकारांच्याही रचनांमध्ये बदल दिसून येत होता.1949 नंतर शैलेंद्र, हसरत जयपुरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, राजेंद्रकृष्ण, शकिल बदायुनी या गीतकारांची सद्दी सुरू झाली.

आधीच्या पोषाखी साचेबद्ध अभिनय करणार्‍या नायिकांपेक्षा नर्गिसच्या पिढीच्या नायिका बदलल्या. एकट्या सुरैय्याचा अपवाद मात्र होता. पुढेही मिर्झा गालिब पर्यंत सुरैय्याचे चित्रपट येत राहिले. तिच्या चाहत्यांना रिझवत राहिले. पण नंतर सुरैय्याही मागे पडली. खरं तर सुरैय्याने पार्श्वगायनासाठी इतरांचा आवाज वापरला असता तर ती अजून काही काळ पडद्यावर टिकली असती. 

लतासोबतच गीताच्या आवाजाचा वापरही सुरू झाला होता. राज-नर्गिस जोडीचा ‘जान पेहचान’ ‘बरसात’ नंतर लगेच पुढच्या वर्षी पडद्यावर आला होता. त्यात तलत-गीताच्या आवाजात खेमचंद प्रकाश यांनी सुंदर युगलगीत दिलं होतं, ‘अरमान भरे दिल की लगन तेरे लिये है’. गीताबालीसाठी ज्याप्रमाणे ‘बाजी’त गीतानं मस्तीभरे रंग भरले होते त्या सोबतच ‘आनंदमठ’ चित्रपटात ‘नैनों मे सावन’ हे व्याकुळ आर्त गीतही दिलं होतं. 

एस.एन.त्रिपाठी यांच्यावर धार्मिक चित्रपटांचा शिक्का बसला आणि त्यांचे संगीत दुर्लक्षिल्या गेलं. पण त्यांनी ‘लक्ष्मी नारायण’ (51) मध्ये मीनाकुमारीसाठी गीताच्या आवाजाचा फार सुंदर वापर करून घेतला होता. यातील ‘आज अचानक जाग उठी’ हे गाणं फार गोड आहे.    

या काळात आशाचा आवाज या पाच नायिकांसाठी फारसा वापरला गेला नाही.

‘बाजी’ पासून सचिनदेव बर्मन यांच्या संगीताला एक वेगळी झळाळी लाभली. तसेच ‘आरपार’ नंतर ओ.पी.नय्यरनं एक वेगळा ठेकाप्रधान बाज संगीतात आणला आणि लोकप्रिय करून दाखवला. या पाच नायिकांपैकी मधुबालासाठी  ‘मिस्टर ऍण्ड मिसेस 55’ मध्ये त्यानं गीताच्या आवाजाचा वेगळा अफलातून वापर सिद्ध करून दाखवला. ‘उधर तूम हसी हो’ सारखं अवखळ युगल गीत, ‘ठंडी हवा काली घटा’ सारखं खट्याळ सोलो आणि ‘प्रीतम आन मिलो’ सारखं आर्त सारं सारं गीताच्या आवाजात मधुबालासाठी पडद्यावर साकार केलं. 

हा जो बदलाचा कालखंड आहे त्यात संगीतकारांचा तर सिंहाचा वाटा आहे. जूने संगीतकार बाजूला सरकून शंकर जयकिशन आणि ओ.पी.नय्यर हे नवे संगीतकार काही एक नवा बाज घेवून आले होते. पण जून्यापैकी काही मात्र या बदलातही टिकून राहिले. नव्हे त्यांनी या नव्यांच्या बरोबरीने इतिहास रचला. जून्यापैकी जे संगीतकार नविन काळात घट्ट टिकून राहिले त्यात प्रमुख होते नौशाद, सी. रामचंद्र आणि सचिनदेव बर्मन. 
नर्गिस, मधुबाला आणि गीताबाली यांचे चित्रपट या काळात (1949 ते 1954) जास्त चालले. त्या मानाने मीनाकुमारी आणि वैजयंतीमाला यांचे फारसे चित्रपट आले नाही किंवा बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. 
या पहिल्या पाच नायिकांमध्ये केवळ वैजयंतीमालाच अशी एकटी होती की जीच्याकडे कमालीची नृत्यनिपुणता होती. केवळ तिला डोळ्यापुढे ठेवून पुढे नृत्यप्रधान गाणी रचली गेली. त्या तुलनेने नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी यांना मर्यादा होत्या. त्यांची गाणी नृत्यप्रधान नाहीत. गीताबालीसाठी एक थोडीशी वेगळी सोय पडद्यावर करून घेण्यात आली. बाजी नंतर तिच्या वाट्याला क्लब सॉंग जास्त यायला लागली. अशा खट्याळ गाण्यांसाठी किमान आवश्यक अशा नृत्य हालचाली गीताबालीनं शिकून घेतल्या. आणि ही गाणी पडद्यावर उठून दिसायला लागली. 

बिमल रॉय यांच्या ‘सीमा’ (1955) मधून नुतनला मोठा ब्रेक मिळाला. ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’ म्हणत आलेली नुतन पुढे खरंच ‘लंबा’काळ हिंदी सिनेमाचा पडदा व्यापून राहिली. तिच्या पाठोपाठ ओ.पी.नय्यरच्या ‘सीआयडी’(56) मधून वहिदा रेहमान पडद्यावर आली.  आधीच्या पाचही नायिकांची बरोबरी वहिदाने एकाबाबतीत साधली होती. वहिदासाठी या गाण्याला उसना आवाज होता शमशादचा (कही पे निगाह है कही पे निशाना).

पुढचा जो टप्पा आहे तो इथूनच सुरू होतो. ओ.पी.नय्यरच्या संगीतानं एक वेगळा रंग हिंदी चित्रपट संगीताला चढला. पूर्वीच्या पाच नायिकांसोबतच नुतन, वहिदा, मालासिन्हा, आशा पारेख आणि साधना यांचेही चित्रपट गाजायला लागले. या पाच नायिकांसोबत अजून एक गोड आवाज मोठ्या प्रमाात ऐकायला यायला लागला. तो होता आशा भोसलेचा. ओ.पी.नय्यरने आशा, गीतासोबतच जून्या शमशादचा आवाज आपल्या संगीतात वापरून एक वेगळ्या लोकप्रिय गाण्यांची शैली विकसीत केली (कही आर कही पार, बुझ मेरा क्या नाम रे, सैंय्या तेरी अखियों मे दिल खो गया, कही पे निगाह है कही पे निशाना, रेशमी सलवार कुरता जाली का, कजरा मुहोब्बत वाला). पण शमशादची गाणी जास्त करून सहाय्यक अभिनेत्रींसाठी किंवा आयटम सॉंग सारखी वापरली गेली. या दहा नायिकांसाठी तो आवाज फारसा वापरला गेला नाही. (शमशाद सारखीच अवस्था नायिका म्हणून हेलनची होती. तिची गाणी आयटम सॉंग सारखी चित्रपटात असायची. पण तिला स्वतंत्र नायिका म्हणून सिनेमे मिळाले नाहीत.)

1955 पासून नर्गिसच्या चित्रपटांची संख्या कमी कमी होत गेली. आजारामुळे 1960 नंतर मधुबालाचेही दर्शन दुर्मिळ झाले. गीताबालीही बाजूला झाली.  बाकी नायिकांचे मात्र चित्रपट मोठ्या प्रमाणात येत गेले. 
वैजयंतीमाला सोबतच आता नृत्यासाठी वहिदा रेहमानची गाणी गाजायला लागली. नर्गिस बाजूला जाताच पडद्यावरच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून राज-नर्गिस या जोडी ऐवजी देवआनंद-नुतन ही जोडी पडद्यावर रसिकांना आकर्षित करू लागली. नुतनची ही देवआनंदसोबतची गाणी आजही रसिकांच्या विशेष लक्षात आहेत. (उदा. छोड दो आंचल-पेईंग गेस्ट, ओ निगाहे मस्ताना-पेईंग गेस्ट, फिर वोही चांद-बारीश, केहते है प्यार किसको-बारीश, चुपकेसे मिले प्यासे प्यासे-मंझिल, दिल तो है दिवाना ना-मंझिल,  देखो रूठा न करो-तेरे घर के सामने, तेरे घर के सामने-तेरे घर के सामने)  

खरं तर दिलीपकुमार सोबत वैजयंतीमालाची खुप प्रेमगीतं आहेत. ती अप्रतिमही आहेत (मांग के साथ तुम्हारा-नया दौर, दिल तडप तडप के केह रहा है-मधुमती, तेरे हुस्न की क्या तारीफ करू-लीडर). पण दिलीपकुमारची प्रतिमा काहीशी शोकात्म नायकाची असल्याने रसिकांनी दाद देवूनही प्रेमी युगुलाची प्रतिमा फारशी ठसली नाही. 

दिलीपकुमार सारखीच अडचण मीनाकुमारीची झाली. तिची प्रतिमाही शोकात्म अभिनय साकारणारी नायिका अशीच बनली. मग याच काळात आलेली तिची अप्रतिम अशी प्रेमगीतं गाजूनही त्या दृष्टीनं लक्षात घेतली जात नाहीत ( उदा. तू गंगा की मौज मै-बैजू बावरा, झूले मे पवन की-बैजू बावरा, सावले सलोने आये दिन बहार के-एक ही रास्ता, कहता है दिल तूम हो-मेमसाहिब, तूने मेरा दिल लिया-शरारत, दो सितारों का जमी पर-कोहिनूर, कोई प्यार की देखे जादूगरी-कोहिनूर)

माला सिन्हा गुरूदत्तच्या प्यासानं पहिल्यांदा प्रकाश झोतात आली. तीला या पहिल्याच चित्रपटात ‘हम आपकी आंखो मे’ हे रफी-गीताच्या आवाजातील अप्रतिम प्रेमगीत मिळालं. मग पुढेही तिला अतिशय गोड अशी प्रेमगीतं मिळत गेली (फिर ना किजीये मेरे गुस्ताख निगाहों से गीला- फिर सुबह होगी, तेरे प्यार का आसरा चाहता हू-धूल का फुल, तस्वीर तेरी दिल मे-माया, इब्तेदा ए इश्क मे हम-हरियाली और रास्ता, दिल तेरा दिवाना है सनम-दिल तेरा दिवाना, इन हवाओं मे-गुमराह, तूम्हे पाके हमने-गेहरा दाग)

या काळात ‘सीआयडी’,  ‘प्यासा’, ‘कागज के फुल’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहब बिबी और गुलाम’ आणि ‘12 ओ क्लॉक’ या गुरूदत्त-वहिदाच्या सिनेमांची ऐक वेगळी छाप संगीतातून पडते. वहिदाच्या वाट्याला फार सुरेख गाणी आली आहेत. सीआयडीचा अपवाद वगळला तर बाकी सगळ्यात वहिदा नायिका आहे. साहब बिबी और गुलाम मध्ये तिची भूमिका सहनायिकेची आहे हे खरं आहे. पण ‘भवरा बडा नादान’ सारखं सुंदर गाणं तिच्या वाट्याला आलं आहेच.

कॅमेर्‍याचा अप्रतिम वापर करत वहिदाची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्यात गुरूदत्त यशस्वी ठरला. कारण पुढे ‘गाईड’चा अपवाद वगळता वहिदासाठी कॅमेर्‍याचा विलक्षण वापर फारसा कुठे आढळत नाही. 
हाच फायदा देवआनंद प्रॉडक्शनच्या अगदी दोनच चित्रपटांतून नुतनलाही मिळाला (पेईंग गेस्ट, तेरे घर के सामने). चांगल्या दिग्दर्शकामुळे एक विशिष्ट प्रतिमा तयार होते. आणि सोबतीला गाणी असतील तर ही प्रतिमा कायमची ठसून जाते. 

आशा पारेख प्रकाशात आली ती धसमुसळ्या शम्मीच्या ‘दिल दे के देखो’मुळे. रफीचं ‘दिल दे के देखो’ हे शीर्षक गीत प्रचंड गाजलं आणि शम्मी, आशा पारेख यांना पुढे याचा फायदा झाला. फायदा झाला नाही तो संगीतकार उषा खन्नालाच. तिचं संगीत म्हणजे मामा ओ.पी.नय्यरच तिच्या नावानं देतो असा आरोप केल्या गेला. आणि हा गैरसमज असा काही पसरला की चांगली प्रतिभा असूनही उषा खन्ना या तेंव्हाच्या एकमेव महिला संगीतकाराला पुढे फारसे चित्रपट मिळाले नाहीत. 

आशा पारेख वैजयंतीमाला, वहिदा रेहमान यांच्या सारखी अतिशय चांगली नृत्यांगना होती. परिणामी तिला तोही एक फायदा झाला. तिच्यासाठी चांगली गाणी तयार व्हायला लागली. तिच्या चित्रपटांना व्यवसायिक यश सुरवातीपासूनच लाभत गेलं. 1966 हे एक वर्ष तर असं आहे की बॉक्स ऑफिसवर यशस्वी 10 मधील 4 चित्रपट तिचे होते. (तिसरी मंझिल, लव्ह इन टोकियो, दो बदन, आये दिन बहार के)

आशा पारेखच्या पाठोपाठ साधनाचा ‘लव्ह इन सिमला’ (60) पडद्यावर आला. एक वेगळा सुंदर टवटवीत चेहरा सिनेजगताला मिळाला. साधना आशा पारेख यांच्या मुळे एक बदल पडद्यावर जाणवायला लागला. तो म्हणजे नायिकेची केश रचना, तिचे कपडे हे बदलत गेलं. खोप्यासारखी उंचावलेली केशरचना तंग चुडीदार पंजाबी ड्रेस आणि वार्‍यावर उडणारी ओढणी हे शिवाय हे चित्रपट आता कृष्ण धवल न राहता रंगीत बनत चालले होते. जुन्यांपैकी वहिदा, वैजयंतीमाला, माला सिन्हा यांनी हा बदल तातडीने स्वीकारला आणि त्यांना तो शोभूनही दिसला. त्यामानाने नुतन मात्र फारशी खुलली नाही. एव्हाना मधुबाला, गीताबाली, नर्गिस यांचा कालखंड संपला होता.

मीनाकुमारीला केंद्रभागी ठेवून चित्रपट 1960 नंतर यायला लागले. असे भाग्य इतर कुणा नायिकेला लाभले नाही. या चित्रपटांमधुन तिच्यासाठी काहीशी वेगळी आर्त गाणीही पडद्यावर यायला लागली. त्याला रसिकांनी मोठा प्रतिसादही दिला. दिलीप कुमार बरोबरच्या ‘कोहिनूर’ सोबतच ‘दिल अपना और प्रीत पराई’ आला. यातील ‘अजीब दास्तां है ये, कहा शुरू कहां खतम’ सारख्या गाण्यांनी तिची एक शोकात्म प्रतिमा तयार झाली. ही प्रतिमा शेवटपर्यंत तिला पुसता आली नाही. 

आशा पारेख आणि साधना या नर्गिसच्या काळाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या शेवटच्या नायिका. कारण यांनी जुन्या पद्धतीच्या गाण्यांमधूनही आपली अभिनयक्षमता दाखवली होती. यांची कपडेपट्टी, चेहरेपट्टी आणि गाण्याची पट्टीही जून्यांसारखी असायची. नंतर काळाप्रमाणे बदल होत गेला. किंबहूना याच दोघी आणि त्यांच्या जोडीला मालासिन्हा या बदलाच्या जनक होत्या.

आशा पारेख ‘जब प्यार किसीसे होता है’ पासून ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ पर्यंत बदलत गेली. साधना ‘ओ सजना बरखा बहार आयी’ पासून ‘ आ जा आयी बहार’ पर्यंत बदलत गेली. 

1966 नंतर संगीतच बदलत गेलं. तिसरी मंझिल मध्ये ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ म्हणत नाचणारी शम्मी सोबतची  आशा पारेख पुढे ‘आजा पिया तोसे प्यार दू’ (बहारों के सपने-67) म्हणणारी फारशी आढळत नाही. हे गाणं राहूलदेव बर्मनचं आहे हे पण त्याच्या ‘आजा आजा’ वाल्या रसिकांना पटवून सांगावे लागते. 

साधना कट नसलेली वेणीमधील साधना ‘तेरा मेरा प्यार अमर’ म्हणत लताच्या अवाजात शंकर जयकिशनच्या संगीतात शांतपणे रस्त्यावरून पौर्णिमेचा चंद्र सोबत घेवून चालायची ती आजही मोहक संवेदनक्षम बोलकी वाटते पण ती त्याच लताच्या आवाजात संजय खान सोबत नावेत बसून ‘हम तुम्हारे लिये तूम हमारे लिये’ (1969) गायला लागली तेंव्हा विलक्षण कृत्रिम कचकड्याची वाटायला लागली.

नर्गिस सोबतच  कामिनी कौशल (शबनम-49, आरजू-50), नलिनी जयवंत (आंखे-50, जादू-51), निम्मी (दीदार-51, दाग-52, आन-52, आंधिया-52, बसंत बहार-56, भाई भाई-56), बिना रॉय (अनारकली-53, इन्सानियत-55) यांचेही चित्रपट पडद्यावर गाजत होते. पुढे नुतन वहिदाच्या सोबतच श्यामा (शर्त-54, आरपार-54, भाई भाई-56, भाभी-57, शारदा-57), शकिला (आरपार-54, सीआडी-56,चायना टाऊन-62), नंदा (तुफान और दिया-56, भाभी-57, छोटी बेहन-59, कानून-60, हमदोनो-61, जब जब फुल खिले-65) यांचेही रूपेरी पडद्यावर स्वागत रसिकांनी बॉक्स ऑफिसवर मोठे कलेक्शन करून केले. 

साधना-आशा पारेख यांच्या नंतर कल्पना (देव आनंदची पत्नी कल्पना कार्तिक नव्हे, शम्मी कपुरसोबत प्रोफेसर मधील नायिका), सायरा बानो, शर्मिला टागोर, राजश्री आणि बबिता यांचा बोलबाला सुरू झाला. 
पण असं असले तरी जो दबदबा आणि हक्काचा रसिक गोळा करण्याची ताकद या दहा नायिकांमध्ये होती तशी इतरांमध्ये नव्हती. जसं नायकांमध्ये दिलीप-देव-राज यांच्या नंतर शम्मी-राजेंद्रकुमार यांनी हक्काचा रसिक तयार केला तसा इतरांना नाही करता आला.

या दस नंबरी नायिकांनी सौ (शंभर) नंबरी गाणी दिली. ‘कानुन’ या एकाच चित्रपटाचा अपवाद वगळता गाणी नसलेला आणि ती गाणीही न गाजलेला चित्रपटच या काळात आला नाही. विशेषत: बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या सगळ्याच चित्रपटांची गाणी गाजली आहेत. 

(दहा नायिका आणि त्यांचे बॉक्स ऑफिसवर गाजलेले चित्रपट तसेच किमान एक तरी गाणं ज्या चित्रपटाचे बिनाकात गाजलं आहे असे चित्रपट ही यादी सोबत दिली आहे. तसेच या दहा नायिकांच्या बिनाका गीतमालेत गाजलेल्या 110 गाण्यांची यादीही जोडली आहे. बिनाका गीतमाला 1953 पासून सुरू झाली. 1967 पर्यंतच्या बिनाकातील गाणी यासाठी विचारात घेतली आहेत.)

नर्गिस (1 जून 1929- 3 मे 1981)
हिट - बरसात (49), बाबुल (50), जोगन (50), आवारा (51), दीदार (51), अनहोनी (52), बेवफा (52), आह (53), श्री 420 (55), चोरी चोरी (56), मदर इंडिया (57)  
इतर - जागते रहो (56), मिस इंडिया (57), घर संसार (58)

गीताबाली (30 नो. 1930- 21 जाने 1965)
हिट - बडी बहेन (49), दुलारी (49), बाजी (51), अलबेला (51), आनंदमठ (51), जाल (52), झमेला (53), बारादरी (55), इन्स्पेक्टर (56)  इतर - कवी (54), वचन (55), अजी बस शुक्रिया (58)

मधुबाला (14 फेब्रु 1933- 23 फेब्रु. 1969)
हिट - महल (49), दुलारी (49), बेकसुर (50), बादल (51), संगदिल (52), अमर(54), मि.ऍण्ड मिसेस 55 (55), राजहट (56), चलती का नाम गाडी (58), कालापानी (58), फागुन (58), हावरा ब्रिज (58), बरसात की रात (60), मोगल-ए-आझम (60)   इतर - इन्सान जाग उठा (59)

मीनाकुमारी (1 ऑगस्ट 1933- 21 मार्च 1972)
हिट - बैजूबावरा (52), परिणीता (53), फुटपाथ (53), आझाद (55), इक ही रास्ता (56), शारदा (57), यहुदी (58), चिराग कहा रोशनी कहा (59), कोहिनूर (60), दिल अपना और प्रीत पराई (60), जिंदगी और ख्वाब (61), आरती (62), दिल एक मंदिर (62(, काजल (65), फुल और पत्थर (66)
इतर - बादबां (54),  मेमसाहिब (56), मिस मेरी (57), सट्टा बाजार (59), शरारत (59), मै चुप रहूंगी (62), साहब बिबी और गुलाम (62), चित्रलेखा (64), भिगी रात (65)

वैजयंतीमाला (13 ऑगस्ट 1936- )
हिट - बहार (51), लडकी (53), नागिन (54), देवदास (55), न्यु दिल्ली (56), नया दौर (57), आशा (57), मधुमती (58), साधना (58), पैगाम (59), गंगा जमूना (61), आस का पंछी (61), संगम (64), जिंदगी (64), सुरज (66)
इतर - देवता (56),  इक झलक (57), कठपुतली (57), अमरदीप (58), सितारोंसे आगे (58), नजराना (61), लिडर (64)

नुतन - (4 जून 1936 , 21 फेब्रु. 1991)
हिट - सीमा (55), पेईंग गेस्ट (57), दिल्ली का ठग (58), अनाडी (59), सुजाता (59), तेरे घर के सामने (63), बंदिनी (63), खानदान (65)
इतर - शबाब (54),  कभी अंधेरा कभी उजाला (58), सोने की चिडीया (58), कन्हैय्या (59), छलिया (60), दिल ही तो है (63), दिल ने फिर याद किया (66)

माला सिन्हा (1936- )
हिट - प्यासा (57), फिर सुबह होगी (58), परवरिश (58), धुल का फुल (59), हरियाली और रास्ता (62), दिल तेरा दिवाना (62), अनपढ (62), गुमराह (63), गेहरा दाग (63), हिमालय की गोद मे (65)  
इतर - चंदन (58), दुनिया न माने (59), लव्ह मॅरेज (59), मै नशे मे हू (59), धर्मपुत्र (61), माया (61), बॉम्बे का चोर (62), 11 हजार लडकिया (62), बहुबेटी (65), बहारे फिर भी आयेंगी (66), दिल्लगी (66)

वहिदा (3 फेब्रु. 1938- )
हिट - सी.आय.डि. (56), प्यासा (57), चाहदवी का चांद (60), काला बाजार (60), 20 साल बाद (62), मुझे जीने दो (63), गाईड (65)  
इतर - सेालवा साल (58), 1 फुल 4 कांटे (60), रूप की रानी चोरों का राजा (61), बात इक रात की (62), साहब बिबी और गुलाम (62), इक दिल सौ अफसाने (63), कोहरा (64), दिल दिया दर्द लिया (66), तिसरी कसम (66)

साधना (सप्टें 1941-  25 डि. 2015)
हिट - लव्ह इन सिमला (60), हमदोनो (61), इक मुसाफिर इक हसिना (60), असली नकली (62), मेरे मेहबुब  (63), राजकुमार (64), वो कौन थी (64), वक्त (65), आरजू (65), मेरा साया (66)  
इतर - परख (60), मनमौजी (62), दुल्हा दुल्हन (64), बदतमिझ (66)

आशा पारेख (2 ऑक्टोबर 1942- )
हिट - दिल देके देखो (59), घुंघट (60), जब प्यार किसीसे होता है (61), घराना (61), फिर वोही दिल लाया हू (63), जिद्दी (64), मेरे सनम (65), तिसरी मंझिल (66), लव्इ इन टोकियो (66), दो बदन (66), आये दिन बहार के (66)  इतर - हम हिंदुस्थानी (60), छाया (61), बीन बादल बरसात (63)


नर्गिस 
1.आजा रे अब मेरा दिल पुकारा लता/मुकेश हसरत शंकर जयकिशन आह (53)
2.इचक दाना बिचक दाना लता/मुकेश हसरत शंकर जयकिशन श्री 420 (55)
3.पंछी बनू उडके फिरू लता हसरत शंकर जयकिशन चोरी चोरी (56)
4.ये रात भिगी भिगी मन्ना/लता शैलेंद्र शंकर जयकिशन चोरी चोरी
5.आजा सनम मधुर चांदनी मन्ना/लता हसरत शंकर जयकिशन चोरी चोरी
6.जागो मोहन प्यारे लता शैलेंद्र सलिल चौधरी जागते रहो (56
7.दुनिया मे हम आये है तो लता/उषा शकिल नौशाद मदर इंडिया (57)
8.नगरी नगरी द्वारे द्वारे लता शकिल नौशाद मदर इंडिया
मधुबाला 
9.उधर तूम हसी हो रफी/गीता मजरूह ओ.पी.नय्यर मि.ऍण्ड मिसेस 55 (55)
10.इक लडकी भिगी भागीसी किशोर मजरूह एस.डि.बर्मन चलती का नाम गाडी (58)
11.हाल कैसा है जनाब का किशोर/आशा मजरूह एस.डि.बर्मन चलती का नाम गाडी
12.एक परदेसी मेरा दिल ले गया रफी/आशा कमर जलालाबादी ओ.पी.नय्यर फागुन (58)
13.चांदसा मुखडा क्यू शरमाया रफी/आशा शैलेंद्र एस.डि.बर्मन इन्सान जाग उठा (59)
14.मोहे पनघट पे नंदलाल लता शकिल नौशाद मोगल ए आझम (60)
15.प्यार किया तो लता शकिल नौशाद मोगल ए आझम
16.मुहोब्बत की झुठी कहानी पे लता शकिल नौशाद मोगल ए आझम
17.हमे काश तूमसे मुहोब्बत होती लता शकिल नौशाद मोगल ए आझम
18.जिंदगीभर नही भूलेगी  रफी/लता साहिर रोशन बरसात की रात (60)

गीताबाली 
19.सारी सारी रात तेरी याद लता फारूख कैसर रोशन अजी बस शुक्रिया (58)

मीनाकुमारी 
20.कैसे कोई जिये गीता इंदिवर तिमिर बरन बादबां (54)
21.ओ रात के मुसाफिर रफी/लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार मिस मेरी (57)
22.ये मर्द बडे बेदर्द लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार मिस मेरी
23.मेरी जा मेरी जा प्यार किसीसे लता शैलेंद्र शंकर जयकिशन यहूदी (58)
24.टिम टिम करते तारे लता रवी रवी चिराग कहा रोशनी कहा (59)
25.अजीब दास्तां है ये लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई (60)
26.मेरा दिल अब तेरा  लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई
27.दिल अपना और प्रीत पराई लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई
28.शीशा ए दिल इतना ना उछालो लता हसरत शंकर जयकिशन दिल अपना और प्रीत पराई
29.दो सितारों का जमी पर रफी/लता शकिल नौशाद कोहिनूर (60)
30.ज्योती कलश झलके लता नरेंद्र शर्मा सुधीर फडके भाभी की चुडिया (61)
31.कभी तो मिलेगी लता मजरूह रोशन आरती (62)
32.आपने याद दिलाया  रफी/लता मजरूह रोशन आरती
33.रूक जा रात ठहर जा रे चंदा लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल एक मंदिर है (63)
34.दिल एक मंदिर है रफी/सुमन हसरत शंकर जयकिशन दिल एक मंदिर है
35.छू लेने दो नाजूक होठों को रफी साहिर रवी काजल (65)
36.दिल जो न कह सका लता मजरूह रोशन भिगी रात (65)

वैजयंती माला 
37.मन डोले मेरा तन लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार नागिन (54)
38.मेरा दिल ये पुकारे आजा लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार नागिन
39.जादूगर सैय्या लता राजेंद्रकृष्ण हेमंतकुमार नागिन
40.मांग के साथ तूम्हारा रफी/आशा साहिर ओ.पी.नय्यर नया दौर (57)
41.आजा जरा मेरे हेमंत/गीता एस.एच.बिहारी हेमंतकुमार एक झलक (57)
42.बोल रे कठपुतली  लता शैलेंद्र शंकर जयकिशन कठपुतली (57)
43.बागड बम बागड बम लता हसरत शंकर जयकिशन कठपुतली (57)
44.आजा रे परदेसी लता शैलेंद्र सलिल चौधरी मधुमती (58)
45.ओ बिछूआ मन्ना/लता शैलेंद्र सलिल चौधरी मधुमती (58)
46.औरत ने जनम दिया  लता साहिर एन.दत्ता साधना (58)
47.कहो जी तूम क्या क्या लता साहिर एन.दत्ता साधना (58)
48.देख हमे आवाज न देना रफी/आशा राजेंद्रकृष्ण सी.रामचंद्र अमरदीप (58)
49.धुंडो धुंडो रे साजना लता शकिल नौशाद गंगा जमुना (61)
50.तूम रूठी रहो मै मनाता रहू मुकेश/लता हसरत शंकर जयकिशन आस का पंछी (61)
51.बिखरा के जुल्फे चमन मे मुकेश/लता राजेंद्रकृष्ण रवी नजराना (61)
52.मै का करू राम मुझे लता हसरत शंकर जयकिशन संगम (64)
53.हम प्यार का सौदा  लता हसरत शंकर जयकिशन जिंदगी (64)
54.तेरे हुस्न की क्या रफी/लता शकिल नौशाद लिडर (64)
55.तितली उडी उड जो चली शारदा शैलेंद्र शंकर जयकिशन सुरज (66)

नुतन 
55.मन की बीन मतवाली बाजे रफी/लता शकिल नौशाद शबाब (54)
56.छोड दो आंचल किशोर/आशा मजरूह एस.डि.बर्मन पेईंग गेस्ट (57)
57.प्यार पर बस तो नही तलत/आशा  साहिर ओ.पी.नय्यर सोने की चिडीया (58)
58.वो चांद खिला मुकेश/लता हसरत शंकर जयकिशन अनाडी (59)  
59.बन के पंछी गाये लता हसरत शंकर जयकिशन अनाडी (59)
60.बचपन के दिन भी गीता/आशा मजरूह एस.डि.बर्मन सुजाता (59)
61.तेरे घर के सामने रफी/लता हसरत एस.डि.बर्मन तेरे घर के सामने (63)
62.मोरा गोरा अंग  लता गुलजार एस.डि.बर्मन बंदिनी (63)
63.तूम्ही मेरे मंदिर लता राजेंद्रकृष्ण रवी खानदान (65)
64.नील गगन पर उडते बादल रफी/आशा राजेंद्रकृष्ण रवी खानदान (65)
65.दिल ने फिर याद किया मुकेश/रफी/सुमन जी.एस.रावेल सोनिक ओमी दिल ने फिर याद किया (66)

वहिदा  
66.जाने क्या तूने कही गीता साहिर एस.डि.बर्मन प्यासा (57)
67.चौदहवी का चांद हो रफी शकिल रवी चौदहवी का चांद (60)
68.तूम जो दिल के तार लता शैलेंद्र शंकर जयकिशन रूप की रानी चोरों का राजा (61)
69.कही दीप जले कही दिल लता शकिल हेमंतकुमार बीस साल बाद (62)
70.ना तूम हमे जानो हेमंत/सुमन मजरूह एस.डि.बर्मन बात एक रात की (62)
71.भंवरा बडा नादान है आशा शकिल हेमंतकुमार साहब बिबी और गुलाम (62)
72.इक दिल और सौ अफसाने लता हसरत शंकर जयकिशन एक दिल सौ अफसाने (63)
73.झूम झूम ढलती रात लता कैफी आझमी हेमंतकुमार कोहरा (64)
74.गाता रहे मेरा दिल किशोर/लता शैलेंद्र एस.डि.बर्मन गाईड (65)

माला सिन्हा 
75.तेरे प्यार का आसरा लता/महेंद्र साहिर एन.दत्ता धूल का फुल (59)
76.धडकने लगे दिल के आशा/महेंद्र साहिर एन.दत्ता धूल का फुल (59)
77.झुमता मौसम मस्त नजारा मन्ना/लता हसरत शंकर जयकिशन उजाला (59)
78.तस्वीर तेरी दिल मे रफी/लता मजरूह सलिल चौधरी माया (61)
79.बोल तेरे तकदिर मे क्या मुकेश/लता शैलेंद्र शंकर जयकिशन हरियाली और रास्ता (62)
80.इब्तदा ए इश्क मे हम मुकेश/लता हसरत शंकर जयकिशन हरियाली और रास्ता
81.दिल तेरा दिवाना है रफी/लता शैलेंद्र शंकर जयकिशन दिल तेरा दिवाना (62)
82.आप की नजरों ने समझा लता रा.मेहदी अली मदनमोहन अनपढ (62)
83.है इसी मे प्यार की आबरू लता रा.मेहदी अली मदनमोहन अनपढ
84.दिल की तमन्ना थी मस्ती रफी/आशा मजरूह एन.दत्ता ग्यारा हजार लडकिया (62)
85.इन हवाओं मे आशा/महेंद्र साहिर रवी गुमराह (63)
86.एक तू ना मिला   लता इंदिवर  क.आनंदजी हिमालय की गोद मे (65)
87.ये आजकल के लडके उषा मजरूह लक्ष्मी प्यारे दिल्लगी (66)

आशा पारेख 
88.बडे है दिल के काले रफी/आशा मजरूह उषा खन्ना दिल दे के देखो
89.जिया हो जिया हो कुछ बोल  लता हसरत शंकर जयकिशन जब प्यार किसीसे होता है (61)
90.इतना ना मुझसे तू प्यार तलत/लता राजेंद्रकृष्ण सलिल चौधरी छाया (61)
91.जाईये आप कहा जायेंगे आशा मजरूह ओ.पी.नय्यर मेरे सनम (65)
92.ओ हसिना जुल्फोवाली रफी/आशा मजरूह आर.डि.बर्मन तिसरी मंझिल (66)
93.आजा आजा मै हू प्यार तेरा रफी/आशा मजरूह आर.डि.बर्मन तिसरी मंझिल 
94.ओ मेरे सोना रे सोना रे आशा मजरूह आर.डि.बर्मन तिसरी मंझिल
95.सायोनारा सायोनारा लता हसरत शंकर जयकिशन लव्ह इन टोकियो (66)
96.ये कली कब तलक फुल बनके लता/महेंद्र  आनंद बक्षी लक्ष्मी प्यारे आये दिन बहार के (66)

साधना 
97.ओ सजना बरखा बहार आयी लता शैलेंद्र सलिल चौधरी परख (60)
98.अभी ना जाओ छोड कर रफी/आशा साहिर जयदेव हमदोनो (61)  
99.आप युंही अगर मुझसे रफी/आशा रा.मेहदी अली ओ.पी.नय्यर एक मुसाफिर एक हसिना (62)
100.बहोत शुक्रिया बडी मेहरबानी रफी/आशा एस.एच.बिहारी ओ.पी.नय्यर एक मुसाफिर एक हसिना
101.तेरा मेरा प्यार अमर लता शैलेंद्र शंकर जयकिशन असली नकली (62)
102.आ जा आई बहार लता शैलेंद्र शंकर जशकिशन राजकुमार (64) 
103.नैना बरसे लता रा.मेहदी अली मदनमोहन वो कौन थी (64)
104.जो हमने दास्ता लता रा.मेहदी अली मदनमोहन वो कौन थी
105.मुझे कहते है कल्लू कवाल मुकेश/सुधा गुलशन बावरा क.आनंदजी दूल्हा दूल्हन (64)
106.मैने देखा है की फुलों से लदी आशा/महेंद्र साहिर रवी वक्त (65)
107.अजी रूठ कर अब लता हसरत शंकर जयकिशन आरजू (65)
108.झुमका गिरा रे आशा रा.मेहदी अली मदनमोहन मेरा साया (66)
109.तू जहां जहां चलेगा लता रा.मेहदी अली मदनमोहन मेरा साया
110.नैनोंवाली ने हाये दिल लूटा आशा रा.मेहदी अली मदनमोहन मेरा साया